Marathi e-Batmya

किरीट सोमय्या यांची माहिती, संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट

सुलभ शौचालय उभारणीत घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर केला. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. मात्र वांरवार सुनावली संजय राऊत हे गैरहजर रहात असल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले.

यासंदर्भातील माहिती भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यास संजय राऊत वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात न्यायालयाने सुनावणी घेतली होती. आता २४ जानेवारी रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या आरोप राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता.

शिवडी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे मेधा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत, राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. तसेच राऊत यांना नोटीस बजावून मानहानीच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी केली होती.

Exit mobile version