Marathi e-Batmya

सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक आज सकाळी ६ वाजता न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर भाविकांच्या परतीचा हा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे ३७ भाविक कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान ते सागा येथे अडकून पडले. काठमांडूहून त्यांचे परतीचे विमान २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नियोजित असल्याने वेळेत काठमांडू गाठणे आवश्यक बनले होते. भाविक अडकल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधला. मंत्रालयाकडून आवश्यक सहकार्य मिळाल्यानंतर भाविकांचा सागा ते काठमांडू असा सुरक्षित प्रवास सुरू झाला.

संकटाच्या प्रसंगी तातडीने मदत मिळाल्याबद्दल सर्व भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासन आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार मानले आहेत.

सुरक्षित परतलेल्या भाविकांची यादी:

.क्र.

नाव

लिंग

प्रमोद दिनानाथ केणे

पुरुष

शशिकांत पानगावकर

पुरुष

दत्तात्रेय जोशी

पुरुष

हेमंत मुकुंद दांडेकर

पुरुष

नितीन बाळकृष्ण गांधी

पुरुष

दिनेश गांधी

पुरुष

बजरंग परब

पुरुष

संतोष आळुरकर

पुरुष

समीर अशोकराव घोडेराव

पुरुष

१०

राकेश ज्ञानेश्वर जितेकर

पुरुष

११

श्रीकांत धावले

पुरुष

१२

सुरेंद्र जोशी

पुरुष

१३

श्रीकांत कृष्णा पाटील

पुरुष

१४

आदित्य रजन देशमुख

पुरुष

१५

नितीन सूर्यकांत शिर्के

पुरुष

१६

संजय पांडुरंग देशपांडे

पुरुष

१७

विवेक अरविंद पांडे

पुरुष

१८

सोनाली बेलोसे

महिला

१९

सुनिता पानगावकर

महिला

२०

स्नेहा अस्वद कुलकर्णी

महिला

२१

सुवर्णा रवींद्र जोशी

महिला

२२

वृशाली अभिजीत पुराणिक

महिला

२३

रश्मी सेठ

महिला

२४

पूनम सबनीस

महिला

२५

शमा साठे

महिला

२६

रेणुका आळुरकर

महिला

२७

आरती विनायक काकरमठ

महिला

२८

अपर्णा अशोक कदम

महिला

२९

माधवी जोशी

महिला

३०

रुचा श्रीकांत पाटील

महिला

३१

सोनल जोशी

महिला

३२

सीमा शिंपी

महिला

३३

हेमलता दत्तात्रय बोर्से

महिला

३४

अंजना रजन राजपूत

महिला

३५

संगीता संजय देशपांडे

महिला

३६

स्नेहा विवेक पांडे

महिला

३७

वर्षा करी

महिला

Exit mobile version