Marathi e-Batmya

एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सांगत म्हणाले ,पंकजा सोबतही हेच घडतयं

राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत परळी येथून माजी मंत्री तथा भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर सातत्याने पंकजा मुंडे यांना सातत्याने भाजपाकडून डावलण्यात आल्याचे दिसून येत आले आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी आता आपण कोणासमोर झुकणार नाही असे वक्तव्य करत पक्षांतर्गत विरोधकांना इशारा दिला. मात्र पक्षांतर्गत होत असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे डावलंल जात असल्याबाबत अनेकवेळा पंकजा मुंडे यांना विचारण्यात आले. मात्र आपण पक्षात नाराज नसल्याचे स्पष्टीकरण अनेकवेळा दिले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी नेमक्या मुद्यावर बोट ठेवत पंकजा मुंडे यांनाही डावललं जात असल्याचे वक्तव्य केल्याने पंकजा मुंडे यांच्या नाराजीचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

अलीकडेच पंकजा मुंडे यांनी नाशिक येथे “आपण कुणासमोर झुकणार नाही” असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या होत्या.

यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना भाजपाने प्रचंड त्रास दिला. तेच आता पंकजा मुंडे यांच्याबरोबर घडतंय, अशा आशयाचं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे हयात असताना घडलेल्या एका घटनेची हकिकत सांगताना एकनाथ खडसे म्हणाले, स्वर्गीय भाजपा नेते गोपीनाथ मुंडे हयात असताना, त्यांना भाजपानं किती त्रास दिला? हे मला माहीत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी त्यांना पहाटे चार वाजेपर्यंत वाट पहावी लागली. त्यावेळी मी स्वत: त्यांच्याबरोबर हजर होतो. मधल्या काळात गोपीनाथ मुंडे यांची इतकी छळवणूक झाली की, त्यांच्या मनात पक्ष सोडण्याचा विचार येत होता. पक्ष सोडून द्यावा, अशी स्थिती निर्माण झाली होती. तोच प्रकार आता पंकजा मुंडेंबरोबर सुरू असल्याचे सांगितले.

Exit mobile version