Marathi e-Batmya

विजय वडेट्टीवार यांच्या मागणीवर अजित पवार स्पष्टोक्ती, सोडणार नाही कोणाला

नुकतेच मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्याच्याखोट्या स्वाक्षरी आणि शिक्के असलेली बनावट निवेदने आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर याप्रकरणी मरिन लाईन्स पोलिस स्थानकात मुख्यमंत्री सचिवालयाने गुन्हाही दाखल केला. याप्रश्नी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशा प्रकारच्या घटना होतात हे गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पॉंईट ऑफ इनफॉर्मेशनच्या माध्यमातून ही मागणी केली.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्री कार्यालयात यापूर्वी सुद्धा विशेष कार्यकारी अधिकारी सहा महिने तोतया म्हणून कार्यरत होता. जर राज्याचा कारभार ज्या ठिकाणाहून चालतो त्या मंत्रालयातच तसेच मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात राजरोसपणे तोतया विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून वावरत होता. इतकेच नव्हे तर त्या तोतयाने आठ महिन्यात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा केल्या. कर्मचाऱ्यांच्या बदल्या, शासकीय दस्ताऐवज यांमध्ये हस्तक्षेप तो करत होता. स्वतः फाईल घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जायचा आणि स्वाक्षरी घेऊन यायचा. तो खरा आहे की खोटा विशेष कार्यकारी अधिकारी आहे हे देखील मुख्यमंत्र्याना माहीत नव्हते ही अतिशय दुर्दैवी आणि चिंतेची बाब आहे. हा सर्व गोंधळ बघता राज्यात किती मोठ्या प्रमाणात अनागोंदी सुरू आहे सर्व जनतेला दिसत आहे. हे सर्व नेमकं चाललंय काय, याकडे शासन जबाबदारीने बघणार आहे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत महाराष्ट्राचे धिंडवडे काढण्याचा हा प्रकार असल्याचे सांगून मुख्यमंत्री, उपपमुख्यमंत्री देखील डुप्लिकेट आणा अशी टीका केली.

विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या अजित पवार यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून त्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीरतेने दखल घेतली असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, शिवाय त्याचा तपास सुरु आहे. याप्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाहीही यावेळी दिली.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आढळून आले आहे. ही बाब गंभीर असून तेवढ्याच गंभीरपणे राज्य सरकारने त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे कोण आहे याचा तपास सुरु आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही सांगितले.

Exit mobile version