Marathi e-Batmya

बारामती निवडणूकीसाठी आकाश विजयराव मोरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी

अजित पवार यांच्या निधनाने बारामती विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झालेली आहे. या पोट निवडणूकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीतील अन्य पक्षांकडून कोणाला उमेदवारी देण्यात येणार नाही. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवारी दिली जाणार नाही. परंतु सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवार देणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार काँग्रेस पक्षाकडून आकाश विजयराव मोरे यांना उमेदवारी जाहिर केली आहे.

आकाश विजयराव मोरे हे व्यवसायाने वकील आहेत. आकाश मोरे यांच्या उमेदवारीबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी निर्णय घेत त्यांचा पक्षाच्यावतीने नाव मंजूर केले. आकाश मोरे यांचे वडील विजयराव मोरे हे यापूर्वी विधान परिषदेवर आमदार म्हणून होते. तर आकाश मोरे हे महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव आहेत.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीतील नेते प्रयत्न करत आहेत. मात्र सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने या निमित्ताने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहिर केलेली असताना ओबीसी कार्यकर्त्ये गणेश हाके यांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर काँग्रेसने उमेदवार जाहिर केला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक तशी सोपी राहिली नाही.

Exit mobile version