Marathi e-Batmya

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेवाटप जाहिर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी शपथ घेणाऱ्या त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आज खात्यांचे वाटप जाहिर केले. जून्या मंत्र्यांकडील खाती कायम ठेवत त्यांनी सातत्य राखण्यास प्राधान्य दिले. तसेच अमित शाह यांच्याकडे गृह मंत्रालय, राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय, निर्मला सीतारामन यांना वित्त, जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार आणि नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि महामार्ग मंत्रालय गतवेळे प्रमाणे यंदाही कायम ठेवले आहे.

शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी आणि पंचायती राज हे खाते देण्यात आले आहे. टीडीपीचे राममोहन नायडू यांच्याकडे विमान वाहतूक मंत्रालय देण्यात आले आहे. ते ज्योतिरादित्य सिंधिया यांची जागा घेतील. जेपी नड्डा हे नवे आरोग्य मंत्री राहणार आहेत.

मोदी ३.० ने रविवारी संध्याकाळी आकार घेतला जेव्हा नरेंद्र मोदी यांनी ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि ३६ राज्यमंत्री (MoS) यांच्यासह पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान मोदींची नवीन मंत्रिमंडळ ७२-संख्याबळाचे आहे. त्यात एनडीए NDA भागीदार -टीडीपी TDP, जेडीयु JDU, एलजेपी LJP, शिवसेना आणि इतर ११ मंत्र्यांचा समावेश आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच सामील झालेल्यांमध्ये शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर आणि एचडी कुमारस्वामी यांचा समावेश आहे. चौहान हे विदिशामधून पाच वेळा खासदार आहेत, तर खट्टर हे कर्नालमधून आणि कुमारस्वामी मंड्यातून विजयी झाले आहेत.

टीडीपीचे किंजरापू राममोहन नायडू आणि चंद्रशेखर पेम्मासानी; जेडीयूचे लालन सिंग आणि राम नाथ ठाकूर, आरएलडीचे जयंत चौधरी, एलजेपीचे चिराग पासवान आणि एचडी कुमारस्वामी हे भाजपाच्या मित्रपक्षांचे सात मंत्री पहिल्यांदाच झाले आहेत.

दिवंगत रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान याने नऊ वेळा विक्रमी मतांनी त्यांच्या वडिलांनी घेतलेली हाजीपूरची जागा जिंकली. २०२० मध्ये रामविलास पासवान यांच्या निधनानंतरच्या अशांत कालखंडातून त्यांच्या पक्षाने बिहारमध्ये लढलेल्या पाचही जागा जिंकल्या.

जेडीयूचे राम नाथ ठाकूर हे प्रसिद्ध समाजवादी नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र आहेत. ठाकूर हे नितीश कुमारांशी जवळचे संबंध आणि मागासवर्गीयांमध्ये त्यांचा प्रभाव यासाठी ओळखले जातात. यापूर्वी २००५ ते २०१० दरम्यान त्यांनी बिहारचे मंत्री म्हणून काम केले होते.

मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या खाते वाटपाची हीच ती यादीः-

Exit mobile version