Marathi e-Batmya

भाजपाचे प्रदेश प्रवक्ते आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी राज्यस्तरीय कार्यकारणी जाहिर केली होती. त्यानंतर आता प्रदेश प्रवक्त्यांच्या नावांची यादी जाहिर केली.

या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे –
महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते

विश्वास पाठक, प्रमोद जठार, अजित चव्हाण, अवधूत वाघ, गणेश खणकर, श्वेता शालिनी, शिवराय कुलकर्णी, राम कुलकर्णी, अतुल शाह, विनोद वाघ,  गणेश हाके, कुणाल टिळक, विनायक आंबेकर, राजीव पांडे, पंकज मोदी, असिफ भामला, जितेन गजारिया, प्रमोद राठोड, प्रिती गांधी, शिवानी दाणी, अजय पाठक, लक्ष्मण सावजी, समीर बाकरे.

विभागीय प्रसिद्धी प्रमुख

कोकण- सतिश धारप, ठाणे – दिपेश म्हात्रे, पालघर – समीर पाटील, पूर्व विदर्भ – कल्पना नालस्कर, पश्चिम विदर्भ – अन्नु शर्मा, उत्तर महाराष्ट्र – गोविंद बोरसे, पश्चिम महाराष्ट्र – संजय मयेकर.

विशेष म्हणजे रविंद्र चव्हाण यांनी नव्याने निवडलेल्या पदाधिकाऱ्यांमधील एकही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी हा प्रभावी असा नाही. तसेच यातील काही प्रदेश प्रवक्ते हे आपल्या वाणीने आधीच वादग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे या प्रवक्त्यांना त्याचाचा गोदी मिडीया चर्चेसाठीही बोलावत नाही. तर अनेकांचे चेहरे ही भाजपाच्याच नेत्यांना माहित नाहीत. अशा परिस्थितीत रविंद्र चव्हाण यांनी ज्यांचा पुर्नविकास होत नाही अशांचे पुर्नवसन करण्यासाठी जूनेच चेहरे मात्र नव्याने पदाधिकारी म्हणून घेतले आहे का असा सवाल भाजपाकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Exit mobile version