मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जनआशीर्वाद यात्रेचे आय़ोजन करत प्रत्येक जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र सोलापूरातील वालचंद महाविद्यालयात जन आर्शीवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या आदीत्य ठाकरे यांच्या विरोधात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यामुळे शिवसेनेने बँकफूटवर येत ही यात्राच अराजकिय असल्याची घोषणा केली.
वालचंद महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात राजकिय भाषण केल्यास आदीत्य ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भीम आर्मीने पोलिसांकडे केली. त्यामुळे ठाकरे यांनी ही यात्राच अराजकिय असल्याचे जाहीर केले. त्यातच राज्यात भाजपाच सत्तेवर पुन्हा येणार असल्याचे एका सर्व्हेतून पुढे आल्याने शिवसेनेकडून समाजातील इतर घटकांना दुखावणे अशक्य ठरले आहे. त्यामुळे ही यात्राच अराजकिय म्हणून जाहीर केले की राजकिय तोटे फारसे होणार नसल्याची अटकळ शिवसेनेकडून बांधण्यात येत आहे.
भीम आर्मीच्या आंदोलनामुळे आदीत्य म्हणतात जनआर्शीवाद यात्रा अराजकिय
