Marathi e-Batmya

भाजपाकडून या चार जणांना आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी

राज्यसभेवर निवडूण गेलेल्या सात जणांची मुदत नुकतीच संपत आली आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त झालेल्या सात जागांपैकी चार जागांसाठी भाजपाने उमेदवार जाहिर केले. यापैकी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले, पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे, माजी आमदार रामरावजी वडकुते आणि मायाताई चिंतामण इवनाते यांची उमेदवारी भाजपाने जाहिर केली आहे.

सात जणांपैकी राज्यसभेवर महाराष्ट्रातून जाणाऱ्या जागांपैकी चार उमेदवार भाजपाने स्वतःच्या कोट्यातून दिले आहेत. तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक जागा माजी खासदार राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपाकडून केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांना यंदाही भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे रामदास आठवले यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर भाजपाचे केरळाचे प्रभारी तथा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पहिल्यांदा राज्यसभेची उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर विधान परिषदेवरील माजी आमदार रामरावजी वडकुते यांनाही पहिल्यांदा खासदारकीची उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर नागपूरच्या माजी महापौर माया चिंतामण इवनाते यांनाही यंदा राज्यसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

भाजपा- शिवसेना य़ुतीकडून एकूण ६ उमेदवार राज्यसभेसाठी पाठविण्यात येणार आहेत. तर सातवा उमेदवार हा महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर पाठविण्यात येणार आहे. विधानसभेत शिवसेना उबाठा २०, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १० व समाजवादी पार्टीचे २ सदस्य असे मिळून ४८ आमदार विधानसभेत आहेत. या सदस्यसंख्येच्या आधारे राज्यसभेत एक सदस्य महाविकास आघाडीचा जावू शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीकडून एक उमेदवार जाऊ शकतो. त्यामुळे एक जागा महाविकास आघाडीसाठी सोडण्यात आलेली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतून राज्यसभेवर कोणाला पाठवयाचे यावरून आघाडीच्या तिन्ही पक्षात चर्चा सुरु होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाकडून आणि काँग्रेस पक्षाकडून शरद पवार यांच्या नावाला एकमताने पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीकडून शरद पवार हेच राज्यसभेवर जाणार असल्याचे स्पष्ट झाले.

Exit mobile version