Marathi e-Batmya

प्रविण दरेकर यांचा शरद पवार यांना सल्ला, बावनकुळे यांच्यावर टीका करू नका

आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकिट जरी पक्षाने दिलं नसलं तरी त्यांना प्रदेशाचं नेतृत्व भाजपाच्या श्रेष्ठीनं दिलंय याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपाचे आमदार प्रविण दरेकर यांनी करून देत आमच्या नेत्यावर टीका करू नये असा सल्लाही दिला.

पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आणि अजित पवार सारखे जीवाभावाचे नेते का सोडून गेले याचा गांभीर्याने विचार करावा. तसेच त्यांचा पक्ष एकसंध कसा राहिल आणि वाढेल यादृष्टीने विचार करावा असेही सांगितले.

https://twitter.com/mipravindarekar/status/1716057204485431501/video/1

 

पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले, उगाच आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि आमच्या पक्षाची काळजी करू नये आपल्या सोबतचे नेते का सोडून गेले याची काळजी करावी असा उपरोधिक सल्ला देत आमचा पक्ष आणि आमच्या नेत्यांबाबत पक्ष विचार करायला खंबीर असल्याचेही सांगितले.

 

Exit mobile version