Marathi e-Batmya

काँग्रेसची ३९ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहिरः राहुल गांधी वायनाड

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपली ३९ उमेदवारांची यादी आज जाहिर केली. काँग्रेस नेते तथा राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील अमेठीबरोबरच केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज जाहिर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेसने आज जाहिर केलेल्या ३९ उमेदवारांच्या यादीत दक्षिण भारतातील आणि ईशान्य भारतातील उमेदवारांची यादी जाहिर करण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांनी दिली.

के सी वेणूगोपाल यांनी माहिती देताना सांगितले की, १५ उमेदवार हे सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत. २४ उमेदवार हे अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी, अल्पसंख्याक प्रवर्गातील आहेत. या ३९ उमेदवारांपैकी १२ उमेदवार हे ५० वर्षाखालील वयोगटातील, ८ उमेदवार हे ५० ते ६० वयोगटातील तर १२ उमेदवार हे ६१ ते ७० वयोगटातील असून ७ उमेदवार हे ७१ ते ७६ वयोगटातील असल्याचे सांगितले.

आज जाहिर करण्यात आलेल्या ३९ उमेदवारांची यादी ही छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, सिक्कीम, तेलंगणा नागालँड, मेघालय, सिक्कीम, अंदमान निकोबार, त्रिपुरा, नागालँड आणि मणिपूर राज्यातील जागा असल्याचेही के सी वेणूगोपाल यांनी सांगितले.

 

Exit mobile version