Marathi e-Batmya

श्रमिक ट्रेन्सबरोबर आता प्रवासी रेल्वेही सुरु होणार : परंतु निवडक ठिकाणीच

नवी दिल्ली- मुंबई: विशेष प्रतिनिधी
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक नागरिक आपल्या मूळ ठिकाणाहून इतरत्र अडकल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी विशेषत: स्थलांतरीत कामगारांसाठी श्रमिक कामगारांसाठी श्रमिक ट्रेन्स सुरु केल्या. आता त्या पाठोपाठ विशेष प्रवासी वाहतूकीच्या गाड्याही १२ मे पासून सुरु कऱण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला असून त्यासाठी त्यांनी काही ठिकाणे निश्चित केली आहेत.
रेल्वे मंत्रालयाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकानुसार नवी दिल्लीपासून दिबरूगढ, आगरतळा, हावडा, पटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगलेरू, चेन्नई, तिरूंवतपूरम, मडगांव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तवीला जोडणाऱ्या प्रवाशी वाहतूक गाड्या सुरु करण्यात येणार आहे. मात्र या विशेष गाड्या असल्याचे रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे.
याशिवाय उपलब्ध कोच पाहून अन्य नव्या मार्गावरही प्रवाशी गाड्या सुरु करण्यात येणार आहे. विद्यमान स्थितीत सुरु करण्यात आलेल्या गाड्यांसाठी आयआरटीसीच्या वेबसाईटवर ११ मे पासून संध्याकाळी ४ वाजल्यापासून तिकिट बुकींग करता येणार असल्याचेही रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले.

Exit mobile version