Marathi e-Batmya

सीबीआय काही करू शकत नसल्याने ईडीचा वापर

मुंबई: प्रतिनिधी

भाजप नेत्यांच्या विरोधात किंवा धोरणाविरोधात बोलल्यावर लगेच ईडीची नोटीस पाठवण्यात येते. हेच काम सुरुवातीला सीबीआय करत होते. परंतु राज्यात चौकशी करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने  सीबीआयबाबत आता केंद्र काही करु शकत नसल्याची टीका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केली.

ईडीच्या आडून भाजप सूडाचं राजकारण करतंय ही गंभीर बाब आहे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त करत ईडीचा ज्यापध्दतीने राजकारणासाठी वापर होतोय. ते पाहून अशा प्रकारचं राजकारण देशात कधी पाहण्यात आलं नसल्याचे ते म्हणाले.

Exit mobile version