Marathi e-Batmya

अमित शाह यांना खुष करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा जय गुजरातचा नारा

राज्यात एका बाजूला मराठी-हिंदी भाषेचा वाद पेटलेला असतानाच आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अर्थात पुण्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जय गुजरातचा नारा दिला. विशेष म्हणजे जय महाराष्ट्र आणि जय हिंदचा नारा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माईक सोडून गेले होते. मात्र पुन्हा लक्षात येताच माईकवर पुन्हा येत एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला आणि नंतरच माईक सोडल्याचे पाहिला मिळाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा वाद पेटला आहे.

पुण्यात गुजराती समाजाच्यावतीने नव्याने उभारण्यात आलेल्या जयराज स्पोर्टस व कन्वेन्शन सेंटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ च्या सत्ताबदलाची आठवण सांगताना म्हणाले की, अमित शाहंच्या रणनीती आणि नेतृत्वाने अशक्य ते शक्य करून दाखवले. अमित शाह आव्हानांना संधीत बदलतात. त्यांच्या या कार्यक्षमतेचा मी स्वतः अनुभवला आहे. त्यामुळे राज्यात सामान्य मानसांचे सरकार आणणे गरजेचे होते. पंतप्रधान मार्गदर्शन होतेच पण अमित शाह माझ्यामागे पर्वतासारखे उभे राहिले असे सांगितले.

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले, सरकार बदलणे सोपे नव्हते. पण देशाच्या राज्याच्या विकासाचा प्रश्न असतो तेव्हा अशी पावले उचलावी लागतात. यासाठी मी अमित शाह यांचे खूप आभार मानतो असे सांगत त्यांच्यामुळेच आमचे डबल इंजिनचे सरकार जोरात धावत असल्याचे सांगितले.

शेवटी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, अमित शाह हे जरी देशाचे गृहमंत्री असले तरी त्यांच्या घरातील होम मिनिस्टर कोल्हापूरच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी गुजरात आणि मराठी या दोन्ही भाषा आनंदात नांदतात असे सांगायला विसरले नाहीत. तसेच भाषणाचा समारोप करताना अमित शाह यांच्यासाठी शेर ऐकवत म्हणाले की, आपके बुलंद इरादोंसे तो चट्टाने भी डगमगाती है, दुश्मन क्या चीज है, तुफानभी अपना रूख बदल देता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शक्स अदब से झुक जाता है असे सांगत जय महाराष्ट्र, जय हिंद असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाषणाचा समारोप करत माईकचा ताबा सोडला पण लगेच मागे पुन्हा माईकवर येत जय गुजरातचा नारा दिला. त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मनापासून हसताना दिसत होते.

Exit mobile version