Marathi e-Batmya

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना ४८ तास प्रचार करण्यास बंदी

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) प्रमुख के चंद्रशेखर राव यांना लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाने ४८ तासांच्या प्रचारापासून बंदी घातली होती.

आयोगाने केसीआर यांना पक्षाविरोधात केलेल्या कथित “अपमानजनक” टिप्पण्यांबाबत काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीवर नोटीस बजावली.

६ एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, केसीआर यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर आरोप करताना सांगितले की, “काँग्रेसने जगण्यासाठी निरोध [गर्भनिरोधक] आणि पापड विकण्यास सांगितले”, आणि त्यांनी विचारले, “निरोध विकण्यासाठी ते कुत्र्यांचे पुत्र आहेत का? आणि पापड?” पुढे, पक्षाने बीआरएस प्रमुखांवर त्यांना “खालच्या मानसिकतेचे लोक” म्हणून संबोधल्याचा आणि त्यांना धमक्या दिल्याचा आरोप केला.

या तक्रारीनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या आरोपांची चौकशी करून निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला. आयोगाने केसीआर यांना १६ एप्रिल रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

तथापि, केसीआर यांनी हे आरोप फेटाळून लावले, काँग्रेसने त्यांच्या तेलुगू भाषणाचा इंग्रजी अनुवाद फिरवला असा आरोप केला.

“तेलंगणा आणि सिरिल्लामधील निवडणुकीचे प्रभारी अधिकारी तेलुगू लोक नाहीत आणि त्यांना तेलुगूची स्थानिक बोली फारशी कळत नाही. काँग्रेस पक्षाने त्यांच्या पत्रकार परिषदेतील काही वाक्ये संदर्भाबाहेर काढून ही तक्रार केली आहे. वाक्यांचे इंग्रजी भाषांतर योग्य आणि नेमक्या भाषेत नाही,” असे उत्तर बीआरएस प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी आयोगाला सांगितले.

निवडणूक आयोगाने कागदपत्रे आणि भाषणाच्या तपशिलांचे विश्लेषण केल्यानंतर, के चंद्रशेखर राव यांनी आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा निष्कर्ष काढला आणि बुधवारी त्यांना ४८ तास प्रचार करण्यास मनाई केली.

“निवडणूक आयोगाने आदेशात म्हणटले आहे की, बीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांना निवडणूक आचारसंहिता अर्थात एमसीसी उल्लंघनासंदर्भात जारी केलेल्या किंवा भविष्यात जारी केलेल्या कोणत्याही आदेश/सूचनेचा पूर्वग्रह न ठेवता, त्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या चुकीच्या विधानाचा तीव्र निषेध करते असे सांगत ५ एप्रिल, २०२४ रोजी सिरिल्ला येथे आणि वरील गैरवर्तनासाठी के. चंद्रशेकर राव यांना फटकारले,”.

“त्यानुसार, आयोग, भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ अन्वये आणि या अनुषंगाने सक्षम इतर सर्व अधिकार, के. चंद्रशेखर राव, अध्यक्ष, BRS यांना कोणत्याही सार्वजनिक सभा, सार्वजनिक मिरवणुका, सार्वजनिक रॅली, कार्यक्रम आणि मुलाखती घेण्यास प्रतिबंधित करते, १ मे २०२४ रोजी रात्री ८.०० वाजल्यापासून ४८ तास चालू असलेल्या निवडणुकांच्या संदर्भात मीडिया (इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, सोशल मीडिया) इ. मध्ये सार्वजनिक प्रचार करण्यास मनाई करण्यात आल्याचे,” आयोगाने आदेश दिले.
तेलंगणात लोकसभेचे सर्व १७ जागांसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे.

Exit mobile version