मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत मी काय किंवा माझ्या घरातील कोणीही भाजपाच्या तिकिटावर निवडणूकीला उभे राहीले तर कोणालाही मतदान करू नका तुम्हाला बिरोबाची शपथ आहे, असे भाजपाविरोधाचे आवाहन करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना आज भाजपाचे पावन करून घेत बारामतीतून उमेदवारी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर आणि काँग्रेसचे आमदार तथा अम्बरीश पटेल यांचे निकटवर्तीय कांशीराम पवरा यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला.
यावेळी पडळकर बोलताना पडळकर म्हणाले की, आपण पूर्वी भाजपाचा कार्यकर्ताच होतो. मात्र मधल्याकाळात वंचित बहुजन आघाडीत गेलो होतो. परंतु वंचित बरोबर कोणतेही वाद नाहीत किंवा प्रकाश आंबेडकर यांच्याशीही माझा वाद झाला नाही. केवळ धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली निघणार असल्याने आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
पवरा यांनीही आपण पक्ष सांगेल ते काम करणार असल्याचे जाहीर केले.
भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन करणाऱ्या पडळकरांना बारामतीतून उमेदवारी
