Marathi e-Batmya

गुजरातमधील पहिल्या आणि सर्वाधिक लांबीच्या समुद्रावरील सुदर्शन सेतूचे उद्घाटन

गुजरातमधील अरबी समुद्रातील बेत द्वारका देवभूमी ते ओखा या मुख्य भूमिकेची जोडणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या अर्थात २.३५ कि.मी. लांबीच्या समुद्री पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडले. विशेष म्हणजे पुलाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रात बुडालेल्या द्वारकेच्या मंदिराजवळ जात दर्शन घेत काही मोर पिसेही ठेवल्याचा एक व्हिडिओ भाजपाकडून जारी केला.

या पुलासाठी ९७९ कोटी रूपये खर्च करण्यात आला असून या समुद्री पुलाला वांद्रे ते वरळी दरम्यान असलेल्या समुद्री पुलाप्रमाणे या समुद्री पुलाला केबलचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. तसेच या पूलावर पहिल्यांदाच फुटपाथ निर्माण करण्यात आलेला आहे. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूस श्रीकृष्णाचे चित्र काढण्यात आलेली आहेत. तसेच या पुलाला सुदर्शन सेतू असे नावही यावेळी देत असल्याचे जाहिर केले.

Exit mobile version