Marathi e-Batmya

ममता बॅनर्जी म्हणाल्या, आमचा पक्ष इंडिया ब्लॉक मध्येच तर अधीर रंजन चौधरी यांची स्पष्टोक्ती…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष अजूनही विरोधी पक्षांच्या इंडिया ब्लॉकचा एक भाग आहे. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी आपला पक्ष इंडिया ब्लॉकला बाहेरून पाठिंबा देईल असे जाहिरही केले. त्यानंतर एका दिवसाच्या अंतराने काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणात आपले अस्तित्व दाखविण्यासाठी ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीला पाठिंबा देत असल्याचा खोचक टीका केली.

ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सांगितले की तृणमूल काँग्रेस हा इंडिया ब्लॉकचा भाग आहे, परंतु बंगालमध्ये काँग्रेस, सीपीएम आणि त्यांचा पक्ष यांच्यात कोणतीही युती नसल्याचे स्पष्ट केले.

“काँग्रेस आणि सीपीआय(एम), भाजपाच्या निधीतून मतांचे विभाजन करण्याच्या प्रयत्नांना विरोध केला पाहिजे. त्यांना येथे मतदान करू नका. मी स्पष्ट केले आहे की बंगालमध्ये कोणतीही युती नाही, परंतु आम्ही दिल्लीत आघाडीसोबत आहोत. आम्ही असेच राहू,” असेही ममता बॅनर्जी हल्दिया येथील निवडणूक रॅलीत बोलताना म्हणाल्या.

पुढे बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “मी इंडिया आघाडीची स्थापना केली आणि त्याला पाठिंबा देत राहीन. त्याबद्दल कोणताही गैरसमज नसावा,” असा खुलासाही यावेळी केला.

मात्र, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर अविश्वास दाखवत म्हणाले की, त्यांनी आधीच आघाडी सोडली आहे.
माझा त्यांच्यावर विश्वास नाही. ममता बॅनर्जी यांनी युती सोडून पळ काढला. त्या भाजपाच्या दिशेनेही जाऊ शकतात… ते काँग्रेस पक्ष नष्ट करण्याविषयी बोलत होते आणि काँग्रेसला ४० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. पण आता त्या इंडिया आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे बोलत आहेत. याचा अर्थ काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी सत्तेवर येत आहे, असेही सांगितले.

त्याच रॅलीदरम्यान, ममता बॅनर्जी यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम जागेच्या निकालासाठी भाजपावर टीका केली, आपला अन्यायकारक पराभव झाल्याचे सांगत बदला घेण्याची शपथ घेतली.

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला असला तरी, ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पराभूत झाल्या होत्या, जिथे त्यांचे माजी सहकारी-भाजपा उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी मतमोजणीच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांना कमी फरकाने पराभूत केले.

“भारतीय निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक बदलले. मतदानाच्या दिवशी त्यांनी वीजपुरवठा खंडित करून निकालात बदल घडवून आणला. या अन्याया विरोधात दाद मागणार आहे. उद्या किंवा भविष्यात भाजपा कायम राहणार नाही, किंवा सीबीआय किंवा ईडी सारख्या एजन्सीने दाखल केलेल्या याचिका अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत, आणि मी नंदीग्रामच्या लोकांचा निर्णय घेणार नाही असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Exit mobile version