मोहन माझी यांच्या नेतृत्वाखाली ओडिशातील पहिल्या भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा आज (१२ जून) भुवनेश्वर येथे पार पडला.
भुवनेश्वर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात चार वेळा आमदार आणि आदिवासी नेते मोहन चरण माझी यांनी ओडिशाचे पहिले भाजपा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पटनागचे आमदार के.व्ही. सिंह देव आणि निमापारा विधानसभा मतदारसंघातून नवोदित प्रवती परिदा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
जनता मैदानावर राज्यपाल रबघुबर दास यांनी त्यांना गोपनीयतेची आणि पदाची शपथ दिली.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १४७ सदस्यीय विधानसभेत ७८ जागा जिंकत सहज बहुमत मिळविले. पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव न घेता मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरला होता.
ଓଡ଼ିଶାର ମୁଖ୍ୟମନ୍ତ୍ରୀ ଭାବେ ମାନନୀୟ ଶ୍ରୀ @mohanmajhi_BJP ଆଜି ଶପଥ ନେଇଛନ୍ତି। pic.twitter.com/fE0usEZxJ7
— BJP Odisha (@BJP4Odisha) June 12, 2024
