राज्य विधिमंडळाच्या रिक्त झालेल्या १७ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपापले उमेदवार जाहिर केले. या निवडणूकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेंत निवडून गेलेल्या सदस्यांकडून मतदान करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदारांना आता भलताच भाव आला आहे. त्यातच राज्यातील अनेक भागातील जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांवर भाजपा, काँग्रेस, शिवसेनाओएफसी, महाराष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ताब्यात आहे. त्यामुळे या चार ते सहा पक्षांना आपलेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास आला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपाकडून वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मधून अरूण लाखाणी, भंडारा-गोंदिया अविनाथ ब्राम्हणकर, अमरावतीमधून प्रविण पोटे-पाटील, सांगली-सातारामधून धैर्यशील कदम, सोलापूर बार्शीमधून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर-जालना मधून सुहास शिरसाट यांना उमेदवारी, नांदेडमधून अमर राजूरकर, धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघातून बसवराज पाटील आणि जळगांव मधून नंदकिशोर महाजन आणि शेवटी नागपूरमधून राजीव पोतदार अशा या ११ जणांना भाजपाने उमेदवारी जाहिर केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाला ४, २ जागा महाराष्ट्रवादीला दिल्या परंतु त्यातील एक जागा भाजपाने काढून घेतली तर १ जागा सुनिल तटकरे यांच्या अनिकेत तटकरे यांच्यासाठी सोडण्यात आली.
भाजपाने जाहिर केलेल्या उमेदवारांच्या यादीतील अनेक उमेदवार हे निवडणूकीच्या तोंडावर भाजपात घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या उमेदवारांनाही फक्त पक्षचिन्ह बदलून निवडणूक लढवायची आहे. तर निवडून आणण्याची तयारी भाजपाने शिरावर घेतली असल्याने या उमेदवारांना त्यांच्या पुन्हा विधिमंडळावर प्रवेश करणे फारसे अवघड राहिले नाही. यातील काही उमेदवार हे भाजपाचे कट्टर कार्यकर्त्ये आहेत. मात्र ज्यांनी पक्षासाठी त्याग केला, घरादारांवर तुळशीपत्र ठेवले अशा जून्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. जसे की, भाजपाचे जुने कार्यकर्त्ये तथा पदाधिकारी माधव भांडारी, केशव उपाध्ये हे निष्ठावान कार्यकर्त्ये मात्र यंदाच्या निवडणूकीतही वेटींग लिस्टच्या खीजगणतीतही नसल्याचे दिसून आले.
तर काँग्रेसनेही दुपारनंतर विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. काँग्रेसकडून वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर भंडारा-गोंदियातून दिलीप वामन बनसोड, प्रफुल अगरवाल-अपक्ष, नरेश ईश्वरकर-अपक्ष उमेदवारांच्या पाठबळ उभे केले आहे. तर यवतमाळ मतदारसंघातून साहेबराव दत्तराव कांबळे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे, अमरावती मतदारसंघातून हर्षदीप देशमुख यांना तर नागपूर पोट निवडणूकीसाठी अतुल लोंढे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.
लातूर-बीड-धाराशिव मतदारसंघातून महेश देशमुख, नांदेड मतदारसंघातून रामदास पाटील सुखटनकर आणि माधव पाटील जळगावकर यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. सोलापूर मतदारसंघातून आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. अहिल्यानगर मतदारसंघातून करण ससाणे अपक्ष, मच्छिद्र धुमाळ यांना आणि शिवसेना उबाठाच्या कोट्यातून दोन अपक्षांना काँग्रेसने पाठबळ देऊ केले.
शिवसेना शिंदे गटाकडून ठाण्यातून रविंद्र फाटक यांचे नाव अंतिम करण्यात आले असून काल संध्याकाळी उमेदवारी अर्जही भरण्यात आला. अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून भाजपा उमेदवाराच्या विरोधात अर्ज भरला आहे. परभणी हिंगोली मधून सईद खान, यवतमाळ मतदारसंघातून दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रवादीकडून अर्थात अजित पवार यांच्या पक्षाकडून रायगड-रत्नागिरी-सिंधुंदूर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे, आणि पुणे मतदारसंघातून विक्रम काकडे आणि सुनिल टिंगरे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.
शिवसेना उबाठा पक्षाकडून नाशिकमधून अनिल कदम, परभणी हिंगोलीतून डॉ विवेक नावंदर, छत्रपती संभाजीनगर-जालना, देवयानी कृष्ण पाटील-डोणगांवकर आणि, जळगांव मधून शरद तायडे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग मधून सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सांगली सातारा-अनिश्चित, पुणे मधून श्रीकांत पाटील आणि ठाणेमधून अभिजीत पवार यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.
