Tag Archives: विधान परिषद निवडणूक

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून विरोधी उमेदवारांना कोट्यवधींच्या ऑफर्स सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाने लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली; भाजपाला इलेक्शन नाही तर नॉमिनेशन सिस्टिम आणायचीय

भारतीय जनता पक्षाची सर्वत्र सत्ता असतानाही आणखी सत्ता हवी या सत्तेच्या हव्यासापोटी ते लोकशाही मुल्ये पायदळी तुडवत आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी भाजपाने नैतिकता गुंडाळून सर्व हातखंडे वापरले आहेत. भाजपाला लोकशाही नको आहे, ‘इलेक्शन सिस्टिम’ …

Read More »

महाविकास आघाडीच्या काँग्रेसकडून आणि महायुतीतून भाजपा-शिवसेनेने यांना दिली उमेदवारी विधान परिषद निवडणूकीसाठी दिली उमेदवारी

राज्य विधिमंडळाच्या रिक्त झालेल्या १७ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपापले उमेदवार जाहिर केले. या निवडणूकीसाठी   स्थानिक स्वराज्य संस्थेंत निवडून गेलेल्या सदस्यांकडून मतदान करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदारांना आता भलताच भाव आला आहे. त्यातच राज्यातील अनेक भागातील जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांवर भाजपा, काँग्रेस, शिवसेनाओएफसी, महाराष्ट्रवादी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची आरोप, सत्तापिपासू भाजपा महायुतीकडून घोडेबाजार, सत्ता व पैशांचा प्रचंड गैरवापर विधान परिषदेच्या १७ पैकी १५ जागांवर मविआचे एकमत, काँग्रेस ८, शिवसेना ४ तर एनसीपी ३ जागांवर लढणार

राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर एकमत झाले असून दोन जागांवरही लवकरच निर्णय होईल. काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या जागा लढवणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष पुणे, ठाणे व सांगली-सातारा या ३ जागा आणि शिवसेना (उबाठा) रायगड, …

Read More »

एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, आमच्यात मतभेद नाही, विधान परिषद निवडणुकीत महायुती १७ पैकी १७ जागा जिंकणार मराठा समाज, समान नागरी कायदा आणि विकासावर सरकार ठाम

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुती एकजुटीने निवडणूक लढवणार असून सर्व १७ जागांवर विजय मिळवणार, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत जागावाटप सन्मानाने होईल, असे सांगितले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, महाविकास आघाडी विधान परिषदेच्या १७ जागा लढवणार, दोन दिवसात निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाने भाजपा सरकार हादरले, दिल्लीतून महाराष्ट्रात रिकाम्या हाताने येऊ नका

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागा व नागपूरच्या एका जागेवरील पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, दोन दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीने जागा वाटपाचा निर्णय जाहीर करु, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »

विधान परिषदेची आमदारकी- बच्चू कडू थेट शिंदे शिवसेनेत दाखल प्रहार संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व, विधान परिषदेसाठी बच्चू कडू, नीलम गोऱ्हे यांना संधी

मागील काही दिवसांपासून बच्चू कडू शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच माजी मंत्री बच्चू कडू यांनीही विधान परिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासंदर्भात आज अधिकृत घोषणा करण्याच्या काही वेळ आधी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू …

Read More »

विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी डॉ प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठीही निवडणूक

महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे होणाऱ्या नऊ जागांकरिता भारत निवडणूक आयोगाने द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या नऊ सदस्यांची मुदत १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. त्याचप्रमाणे डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. भारत निवडणूक आयोगाने नऊ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक तर एक …

Read More »

जयंत पाटील यांचा पराभव वगळता महायुती-महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी काँग्रेसची सात मते फुटल्याची चर्चा

विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने अकराव्या जागेसाठी जबरदस्त चुरस वाढली. अकराव्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार की दोघांना आपापसात झुंज द्यावी लागणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पुरस्कृत जयंत पाटील यांचा पराभव झाला. …

Read More »

नाना पटोले म्हणाले, उद्धव ठाकरेंशी… संपर्क होऊ शकला नाही NEET परिक्षाच रद्द करा, परिक्षेतील घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा

विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा विचार आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. अर्ज मागे घेण्यास अजून वेळ असून लवकरच यावर निर्णय होईल, अशी आशा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत …

Read More »

विधान परिषदेच्या ४ जागांसाठी एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध शिवसेना उबाठाकडून संकल्प पत्र जाहिर होणार

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून बुधवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती …

Read More »