Marathi e-Batmya

मोदी – शहा, फडणवीस यांच्या नावाने शिमगा

मुंबईः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात हजर होणार असल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून जागोजागी ईडीच्या कार्यालयाकडे येणाऱ्या लोकांची कसून चौकशी आणि तपासणी केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने जमा झाले असून मोदी- शहा आणि फडणवीस यांच्या नावाने शिमगा घालताना दिसत आहेत.
मुंबई पोलिसांनी यावेळी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केल्याचेही पाहायला मिळाले. पोलिसांनी ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवण्याचे काम केले आहे.
सकाळपासूनच कार्यकर्ते या कार्यालयाच्याबाहेर जमा होवून जोरदार घोषणाबाजी दिली जात होती. मोदी – शहा यांच्या नावाच्या घोषणा देत संपुर्ण परिसर दणाणून सोडला. सीएसएमटी परिसर ते अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापर्यंत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Exit mobile version