Marathi e-Batmya

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शेवटची पाच उमेदवारांची यादी जाहिर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आज सकाळी उमेदवारांची पाचवी यादी जाहिर करण्यात आली. या पाचव्या उमेदवारी यादीच पाच जणांना उमेदवारी जाहिर करण्यात आली असून यात मुंबईतील मुलूंड, माढा, अमरावतील मोर्शी आणि पंढरपूर, मोहोळ आणि माढा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये या पाच उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे युट्यूबर गिरीश कराळे यांनी मोर्शीतून उमेदवारी मागितली होती. तसेच उमेदवारांच्या मुलाखती शरद पवार यांनी स्वतः घेतल्यावेळी त्यावेळीही शरद पवार यांनी गिरिश कराळे यांनीही उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती.

त्याचबरोबर मागील अनेक दिवसांपासून माढा विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु होती. त्या अनुशषंगाने माढा मतदारसंघातून अभिजित पाटील यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून अनिल सावंत यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. मोहोळमधून राजू खरे यांना तर मुलुंडमधून संगिता वाजे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटाचा दिवस आहे. आणि या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शेवटची यादी आज सकाळीच जाहिर करण्यात आली.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शेवटची हीच ती यादी 

Exit mobile version