Marathi e-Batmya

राष्ट्रवादीच्या ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी माजी मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार लहू कानडे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील आणि माजी आमदार लहू कानडे यांची प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज नियुक्ती केली आहे.

अनिल भाईदास पाटील यांच्यावर जळगाव, नंदुरबार व धुळे जिल्हा संघटनेच्या प्रभारी पदाची तर लहू कानडे यांच्यावर सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सोपवली. पक्ष वाढीसाठी व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न कराल असा विश्वास व्यक्त करतानाच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत भाजपाने सर्वाधिक जागा लढवित जवळपास तितक्याच जागाही जिंकल्या. त्यामुळे विधाननसभेत भाजपाच्या आमदारांची संख्या महायुतीतील इतरपक्षांपेकी सर्वाधिक जागा आहेत. त्यामेुळे राष्ट्ववादी काँग्रेसच्या कोट्यातील मंत्रीपदे कमी झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भाईदास पाटील आणि छगन भुजबळ या दोघांना मंत्री पदे दिली नाहीत. गतवेळच्या राज्य मंत्रिमंडळात अनिल भाईदास पाटील यांच्याकडे मदत व पुर्नवसन मंत्री पदी विराजमान होते. परंतु त्यांच्याकडे सध्याच्या विद्यमान मंत्री मंडळात स्थान मिळाले नाही.  मदत व पुर्नवसन खात्याचा पदभार आता मकरंद पाटील यांच्याकडे आहे.

याशिवाय क्रिडा मंत्री पदी असलेले संजय बनसोड यांचाही यंदाच्या ंमंत्रि पदासाठी नाव निश्चित करण्यात आले नाही. त्यामुळे संजय बन्सोड यांचा कोणत्याही खात्याचा पदभार नसल्याने ते बिन खात्याचे मंत्री आणि नुसते आमदार म्हणून कार्यरत आहेत.

या दोघांपैकी अनिल पाटील यांच्याकडे संघटनात्मक कामाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्याबरोबरच माजी आमदार लहु कानडे यांचीही प्रदेश उपाध्यक्ष पदावर वर्णी लावण्यात आली आहे.

 

Exit mobile version