Tag Archives: माजी आमदार

दुष्काळ आणि अल निनोमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा माजी आमदार धीरज देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा पाऊस आणि अल निनोच्या प्रभावामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सर्वसमावेशक विशेष दुष्काळ निवारण पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.​ मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात …

Read More »

भाजपाच्या आणखी एका नेत्याच्या मुलीचा कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा उत्तर प्रदेशातील फतेहपूर सदरचे माजी आमदार विक्रम सिंह यांच्या मुलीचा पाठिंबा

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) मोठ्या आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांच्या मुली पुढे आल्या आहेत, आणि आता यात यशस्विनी राजे सिंह यांचे नाव जोडले गेले आहे. कंटेंट क्रिएटर असलेल्या यशस्विनी, उत्तर प्रदेशातील फतेहपूर सदरचे माजी आमदार आणि भाजपचे नेते विक्रम सिंह यांची मुलगी आहे. दिल्लीच्या जंतर मंतर येथे कॉकरोच जनता …

Read More »

विधान परिषदेची आमदारकी- बच्चू कडू थेट शिंदे शिवसेनेत दाखल प्रहार संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व, विधान परिषदेसाठी बच्चू कडू, नीलम गोऱ्हे यांना संधी

मागील काही दिवसांपासून बच्चू कडू शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच माजी मंत्री बच्चू कडू यांनीही विधान परिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासंदर्भात आज अधिकृत घोषणा करण्याच्या काही वेळ आधी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू …

Read More »

काँग्रेसला हात दाखवित कुणाल पाटील यांचा भाजपात प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत

धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी श्री. कुणाल पाटील व त्यांच्या समर्थकांचे स्वागत केले. धुळ्याचे पालक मंत्री जयकुमार रावल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. राम …

Read More »

महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी पाच वर्षासाठी प्रदेशाध्यक्ष पदी केली नियुक्ती

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शंकर कुमार संन्याल यांनी मोहन जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने आदिवासी भागात वसतीगृहे आणि …

Read More »

दोडामार्गतील रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करा वनमंत्री गणेश नाईक यांचे वन विभागाला आदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारा हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करावे. तसेच या हत्तींना तिलारी धरणाच्या परिसरातील संरक्षित क्षेत्रात नेण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. दोडामार्ग तालुक्यातील रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे होणारा त्रासासंदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात  मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. …

Read More »

राष्ट्रवादीच्या ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी माजी मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार लहू कानडे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली निवड जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील आणि माजी आमदार लहू कानडे यांची प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज नियुक्ती केली आहे. अनिल भाईदास पाटील यांच्यावर जळगाव, नंदुरबार व धुळे जिल्हा संघटनेच्या प्रभारी पदाची तर लहू कानडे यांच्यावर सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशाच्या विकासात आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सवी सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. त्यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग क्षेत्रासोबत जोडले आहे. आज भारतातील प्रत्येक नागरिकाचे बँक खाते आहे. त्यामुळे डीजीटल ओळख निर्माण झाली आहे. त्याचा थेट फायदा नागरिकांना मिळत आहे. देशाच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या विकासात आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा असून जेथे आर्थिक संस्था उभ्या …

Read More »

वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट, राजन साळवी आणि मला ऑफर….. लोकसभा निवडणूकीनंतर आलेल्या ऑफरची माहिती

लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूका पार पडून त्यातून निवडूण आलेले सरकारही स्थानापन्न झाले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटातील नेत्यांना भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सातत्याने त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी विविधस्तरावरून कशा ऑफर देण्यात येत होत्या याची माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना …

Read More »

माजी आमदार राजन साळवी भेटले शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना योग्य वेळी निर्णय घेणार असल्याची केले वक्तव्य

कोकणातील शिवसेना उबाठाचे राजन साळवी यांचा विधानसभा निवडणूकीत पराभव झाला. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजन साळवी यांना सतत गुन्हे अन्वेषण विभागाकडून आणि स्थानिक पोलिस प्रशासनाकडून सातत्याने विविध प्रश्नी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलविण्यात येत होते. तसेच त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी करण्यात येत होती. त्यातच राजन साळवी हे विधानसभा निडणूकीत पराभूत झाल्यानंतर …

Read More »