शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील माढा व सोलापूर या दोन लोकसभा क्षेत्र मतदारसंघातील जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख पदापर्यंतच्या शिवसेना पक्षाच्या तसेच युवा सेना, महिला सेना, अंगीकृत संघटनांच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे असे सोबतच्या लेखी प्रसिद्धी पत्राद्वारे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी जाहीर केले आहे.
लवकरच शिवसेना पक्षाच्या वतीने SIR मोहिमेत केलेल्या कामगिरीची नोंद घेऊन व नव्याने मुलाखती घेऊन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब उपरोक्त दोन्ही लोकसभा क्षेत्र मतदारसंघाच्या नवीन कार्यकारिणी ज़ाहिर करतील अशा आशयाचे पत्रही जारी करण्यात आले आहे.
