एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने माढा आणि सोलापूर मधील सर्व कार्यकारण्या बरखास्त नव्याने सर्व कार्यकारणीची स्थापना करणार

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील माढा व सोलापूर या दोन लोकसभा क्षेत्र मतदारसंघातील जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख पदापर्यंतच्या शिवसेना पक्षाच्या तसेच युवा सेना, महिला सेना, अंगीकृत संघटनांच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे असे सोबतच्या लेखी प्रसिद्धी पत्राद्वारे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी जाहीर केले आहे.

लवकरच शिवसेना पक्षाच्या वतीने SIR मोहिमेत केलेल्या कामगिरीची नोंद घेऊन व नव्याने मुलाखती घेऊन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते  एकनाथ शिंदे साहेब उपरोक्त दोन्ही लोकसभा क्षेत्र मतदारसंघाच्या नवीन कार्यकारिणी ज़ाहिर करतील अशा आशयाचे पत्रही जारी करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *