Marathi e-Batmya

पंतप्रधान मोदी यांचे माजी आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांचे निधन

पंतप्रधान मोदी यांच्या आर्थिक सल्लागर समितीचे अध्यक्ष आणि पुणे येथील गोखले आर्थिक आणि राजकिय इन्स्टीट्युटचे माजी कुलपती बिबेक देबरॉय यांचे आज निधन झाले. त्यांचे मृत्यूसमयी ६९ वय होते. त्यांनी मोदी यांना दिलेल्या आर्थिक सल्ल्यामुळे बिबेक देबरॉय याना पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर अजित रानडे यांची कुलपती पदावरून हकालपट्टी करत बिबेक देबरॉय यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयात अजित रानडे यांनी धाव घेतल्यनंतर बिबेक देबरॉय यांनी गोखले इन्स्टिट्युटच्या कुलपती पदाचा राजीनामा दिला.

काही दिवसांपूर्वी देशाची राज्यघटनाही जुनी झाली असून ती बदलण्याची गरज असल्याचे सांगणारा एक भलामोठा लेख काही इंग्रजी वर्तमान पत्रातून प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे देशातील पुरोगामी विचाराच्या लेखकांनी आणि काही प्रसारमाध्यमांनी बिबेक देबरॉय च्या लेखाच्या पाठीमागे कोण आहे आणि राज्यघटना जुनी झाली असे म्हणण्याचे धाडस कसे झाले असे म्हणतं बिबेक देबरॉय आणि भाजपावर एकच टीकेची झोड उठविली होती.

दरम्यान, बिबेक देबरॉय यांच्या निधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत त्यांच्या योगदानावबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर देबरॉय हे ज्ञानी होते अशी पुष्टी जोडच आर्थिक, इतिहास, सांस्कृतिक, अध्यात्म आदी विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. देशाच्या अव्वल धुरिणांच्या यादीत त्यांचे नाव आवर्जून घेतलं जात. सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून देशाची ध्येय धोरण ठरविण्यात ते वाक्बगार होते. याव्यतिरिक्त ऐतिहासिक दस्तावेज तरूणांपर्यंत कसा पोहोचवावा यासाठी अविरत काम केल्याचे भावना मोदी यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरील पोस्टमध्य म्हटले आहेत.

बिबेक देबरॉय नेमके कोण होते?
बिबेक देबरॉय यांचा जन्म १९५५ साली झाला होता. त्यांचे शिक्षण कोलकात्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज येथे घेतले. त्यानंतर ट्रिनिटी येथे पदवुत्तर शिक्षण घेतले.

जागतिकीकरणानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत धोरण ठरविण्यात बिबेक देबरॉय यांची मोलाची भूमिका होती. नीती आयोगाचे सदस्य म्हणून बिबेक देबरॉय यांनी रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी पाठपुरावा केला. तसेच बिबेक देबरॉय यांच्या सूचनांमुळे भारतीय रेल्वेच्या दृश्यात्मक रचनेत काहीप्रमाणात बदल झाला.

Exit mobile version