एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठी असलेला निधी इतरत्र वळवला आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, ते दलित आणि आदिवासी बांधवांच्या विरोधी असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कर्नाटकातील काँग्रेसने गेल्या २ वर्षांपासून एससी आणि एसटी फंडातून १४,००० कोटी रुपये इतरत्र वळवले आहेत. काँग्रेसने या वर्षापासून एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये पीएचडीसाठी दिलेली आर्थिक मदतही रद्द केल्याचा आरोप केला.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपा आणि काँग्रेसमध्ये काही फरक दिसतो का? ते दोघेही सारखेच आहेत. काँग्रेस आणि भाजपा दोन्ही दलित आणि आदिवासीविरोधी असल्याची टीकाही यावेळी केली.
