१९८२ मध्ये केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दलितांसाठी हा शब्द वापरू नये, असे निवेदन दिले होते, याचा कदाचित काँग्रेसला विसर पडलेला आहे.
२०१० मध्ये, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने पुन्हा नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. पण काँग्रेसने हरिजन हा शब्द का वापरला? याचे एकच कारण असू शकते आणि ते म्हणजे अहंकार. काँग्रेससारख्या सापाने वेळोवेळी दलितांना आपले खरे विषारी दात दाखवले असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, गांधीजींनी अस्पृश्यांसाठी हरिजन हा शब्द वापरण्यास सुरुवात केली, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यास कडाडून विरोध केला आणि म्हटले की हा अपमानास्पद आणि फसवा शब्द आहे. जातिवाद आणि अस्पृश्यतेच्या वास्तविक समस्येवर गप्प बसवण्याचा हा प्रयत्न आहे, या संदर्भाची आठवणही करून दिली.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, दलितांनी आता ठरवले पाहिजे की, सौंदर्यप्रसाधने आणि कुटुंबाच्या तालावर नाचणारी कठपुतळी काँग्रेसवर विश्वास ठेवायचा की, स्वतंत्र नेतृत्व असलेला आंबेडकरवादी पक्षावर, जो कोणत्याही जाणवेधाऱ्यांच्या तालावर कधीही नाचला नाही आणि कधी नाचणार नाही. ज्यांनी दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसींच्या राजकीय हक्कांसाठी काम केले असे आवाहनही एक्सच्या माध्यमातूनही ट्विट करत केले.
जब गांधी जी ने अछूतों के लिए हरिजन शब्द का इस्तेमाल करना शुरू किया, तो बाबासाहेब अंबेडकर ने इसका कड़ा विरोध किया और कहा कि यह अपमानजनक और धोखा देने वाला शब्द है, और जाति-भेद और अछूत प्रथा के असली मुद्दे को चुपने करने का प्रयास है।
शायद कांग्रेस भूल गई है कि 1982 में केंद्र… pic.twitter.com/d9eoOA9rBr
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 16, 2024
