Marathi e-Batmya

त्या व्हिडिओवर प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, सत्ता पिलीय? सत्तेबरोबर भ्रष्ट?

काल शनिवारी मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवसभर होते. त्यामुळे नागपूरची चार तासाच्या ढगफुटी सदृष्य पावसाने तुंबई झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांना नागपूरला जाता आले नाही. त्यामुळे पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरची पाहणी केली. यावेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती सांगणाऱ्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीस यांनी जबरदस्तीने ओढून घेतल्याचा एका व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओवरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खोचक सवाल करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

प्रकाश आंबेडकर यांनी तो व्हिडिओ ट्विट करत म्हणाले की, सत्ता पिलीय? सत्तेबरोबर भ्रष्ट ? कि दोन्ही झालंय असा सवाल केला.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, नुकत्याच आलेल्या पूर परिस्थितीमुळे लोकांना सामोर जावे लागलेल्या अडचणीवर आणि नुकसानीच्या लोकांनी केलेल्या तक्रारीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रीया यात फरक असल्याचे दिसून येते. या घटनेत चार जणांचे प्राण गेल्याचे सांगण्यात येते. नागपूरात शिंदे प्रणित शिंवसेना-भाजपा सरकारच्या वागणूकीबद्दल पुष्कळ बोलले जाते ती वागणूक हीच का असा सवालही केला.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, नम्रपणे सांगायचे तर मी आश्चर्यचिकीत झालेलो नाही. मी अगणितवेळा असे पाहिले आहे. अकोला येथेही अशा पध्दतीची वागणूक त्यांची पाहिली आहे. विशेषतः पालकमत्री आणि भाजपाच्या लोकप्रतिनिधींकडून अशी टीपण्णीही केली.

Exit mobile version