Marathi e-Batmya

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट झाले काही वेळापुरते हॅक

मराठी ई-बातम्या टीम

देशाला डिजीटल इंडिया बनविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत त्या अनुषंगाने बरचसे आर्थिक व्यवहार डिजीटल मोडवर आणण्यात यशस्वीही झाले. मात्र आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकांऊट काही काळासाठी हॅक झाले. त्यामुळे प्रशासकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली. परंतु कालांतराने ट्विटर कंपनीला याबाबतची रितसर तक्रार केल्यानंतर त्यांचे अकाऊंट खाते पुर्ववत करण्यात आले.

जगभरातील अनेक देशांमध्ये क्रिप्टो करन्सीला मान्यता देण्यात आली आहे. भारतात मात्र क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूकीला अद्याप मान्यता दिलेली नाही. नेमक्या याच मुद्याच्या अनुषंगाने हॅकरने भारताने क्रिप्टो करन्सीला मान्यता दिल्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यंच्या वैयक्तीक अकाऊंटवरून केले. त्यामुळे अर्थविश्वात एकच आर्श्चय व्यक्त करण्यात येवू लागले. इतके दिवस क्रिप्टो करन्सीला विरोध करणाऱ्या पंतप्रधानांनी एकदम कशी मान्यता दिली.

परंतु ही चूक वेळीच लक्षात येताच पंतप्रधान कार्यालयाने आणि गृह विभागाने तातडीने हालचाली करत ट्विटरला याबाबतची तक्रार करण्यात आली तसेच दिल्लीतील सायबर यंत्रणेला सक्रिय करण्यात आले. काही वेळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा पुर्ववत झाले. यासंदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत अकाऊंटवरून देत आता पंतप्रधान मोदींचे अकाऊंट सुरक्षित असल्याचे जाहिर करण्यात आले.

पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक अकाऊंटवरून ट्विट करण्यात आलेल्या ट्विटचा फोटा खालीलप्रमाणे:

Exit mobile version