Marathi e-Batmya

राहुल गांधी यांचा रायबरेलीतूनही अर्ज दाखल, तर अमेठीतून के एल शर्मा

यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या काही दिवस आधी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याऐवजी राजस्थानमधून राज्यसभेवर निवडूण गेल्या. मात्र राहुल गांधी यांनी वायनाड येथून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उत्तर प्रदेशातून अमेठी किंवा रायबरेलीतून अर्ज भरणार असल्याची चर्चा जोरदार सुरु होती. अखेर आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्व.इंदिरा गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि नेत्या सोनिया गांधी यावेळी उपस्थित होत्या.

विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी तीनवेळा प्रतिनिधीत्व केलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघातून २०१९ साली पराभव झाला. नेमक्या त्याचवेळी राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड येथूनही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेथील लोकसभा मतदारंसघात राहुल गांधी मात्र विजयी झाले. मात्र अमेठीतून राहुल गांधी यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या उमेदवार तथा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा विजय झाला. त्यामुळे स्मृती इराणी यांच्याकडेच या मतदारसंघाची धुरा आहे. मात्र यंदाच्यावेळी येथील काँग्रेसने उमेदवारी के एल शर्मा यांना जाहिर केली. त्यामुळे भाजपाच्या स्मृती इराणी यांचा अमेठीत सामना होणार ते के एल शर्मा यांच्याशी. तर रायबरेलीत राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने आता राहुल गांधी यांचे मताधिक्य किती राहणार यावरून आडाखे बांधण्यात येत आहेत.

दरम्यान, अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा हे बहिण-भाऊ काँग्रेसकडून उमेदवार जाहिरकरणार असल्याचे सांगण्यात होते. तसेच काल दिवसभर सर्व राष्ट्रीय प्रसारमाध्यमे अमेठी आणि रायबरेलीत ठाण मांडून बसलेले दिसून आले.

दरम्यान, रायबरेली येथून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. तसेही दिल्लीच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीचा मार्ग उत्तर प्रदेशातून जात असल्याचे नेहमी बोलले जाते. पाहुया राहुल गांधी हे दिल्लीतील पंतप्रधान पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचतात का हे पुढील निवडणूकीच्या निकालात स्पष्ट होईल. तो पर्यंत वाट पहात रहावे लागणार आहे….

Exit mobile version