Marathi e-Batmya

राहुल गांधी यांची घोषणा, आदिवासींचा जल, जंगल, जमिनचा हक्क काँग्रेस देणार

मणिपूरमधून १४ जानेवारी रोजी निघालेली राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा आज झारखंड राज्यातील बुखारो-धनबाद जिल्ह्यात पोहोचली. बुखारो धनबाद जिल्हा हा कोळसा खाणी आणि स्टील प्लॅन्टसाठी जगभरात प्रसिध्द आहे. मात्र पहिल्यांदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा धनबाद जिल्ह्यात पोहोचताच तेथील जनतेशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, आदिवासींच्या मालकीचे असलेल्या जल, जंगल आणि जमिनींचा हक्क देण्यासाठी काँग्रेस पक्ष २४ तास काम करणार असल्याची घोषणा केली.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बिहार मार्गे झारखंडमध्ये आज दाखल झाली. यावेळी आदिवासींच्या हक्काचे जल जमीन आणि जंगल हे भाजपाच्या सरकारकडून त्यांच्या मित्राच्या घशात घालण्याचे काम सुरु आहे. परंतु काँग्रेसचे सरकार केंद्रात आल्यानंतर आदिवासींचा हक्क असलेल्या जल जंगल जमिनवरील त्यांचा हक्क त्यांना परत मिळवून देण्यासाठी काँग्रेस काम करणार असून २४ तास काम करून हे हक्क आदिवासांनी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

तसेच राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, आदीवासींच्या मुलांना चांगले शिक्षण, चांगल्या आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीही काँग्रेस पक्ष २४ तास काम करणार असल्याचे सांगितले.

यावेळी काँग्रेस नेते जयराम रमेश आणि कन्हैयाकुमार यांच्याकडून आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, केंद्रातील भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून आदिवासींच्या मालकीचे असलेले जल जंगल आणि जमिन मोदींच्या मित्राच्या घशात घालण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यासाठी त्यांना पाहिजे तितके पैसे उपलब्ध करून दिले जात आहेत. तर दुसऱ्याबाजूला आदिवासी समाज, शेतकरी आणि मागासजातीतील लोकांवर अन्याय करत एकाच वर्गातील जाती जातीत भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे जातीच्या वर्चस्वावरून तुम्ही एकमेकांमध्ये भांडत लावण्याचे प्रकार सध्या सुरु असल्याचेही सांगितले.

कन्हैराकुमार पुढे बोलताना म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी आणि काही ठराविक उद्योजकांची मक्तेदारी निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा मोंदीचे मॉडेल काय आहे हे समजून घ्यावे लागेल असे सांगत भाजपा ज्याही राज्यात जाते तेथील जातीत भांडण लावण्यासाठी अंतर्विरोध कसा निर्माण होईल याकडे पहिल्यांदा लक्ष देते. त्यानंतर लोकांचे लक्ष एकदा विचलित झाले की त्या तेथील साधन संपत्ती जी काही जमिन, विमानतळ, उद्योग, कारखाने, खाणी त्यांच्या मित्राच्या घशात घालण्यासाठी प्रयत्न करत असतात असा आरोपही केला.

Exit mobile version