Marathi e-Batmya

दानवेंचा अजब शोध, शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात

जालना: प्रतिनिधी
शेतकरी आंदोलन सुटा बुटातल्या लोकांचे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा धक्कादायक जावई शोध दानवे यांनी लावल्याने त्यांच्या वक्तव्याबाबत आर्श्चय व्यक्त केले.

याच देशांनी CAA च्या नावाखाली मुस्लिम समाजाला उचकावले असून भारतातील शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याचे आवाहन देखील दानवे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. जालना जिल्ह्यातील कोलते टाकली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. हे आंदोलन सुटा बुटातल्या लोकांचे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे असल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.

Exit mobile version