Marathi e-Batmya

सातारा जि.प. निवडणूकीचे पडसाद विधिमंडळात, एकनाथ शिंदे यांनी सांगितले मार खान्याची गोष्ट

राज्यात मूळ शिवसेना असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत बंड करत भाजपाबरोबर सत्तेत सहभागी होण्यासाठी म्हणून तत्कालीन शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा एक मोठा गट भाजपाबरोबर गेला. सत्तेत गेला, सत्तेत रमला आणि आणि आता त्याच्या मिळणाऱ्या उबीतून बाहेर पडायलाही तयार होईना.

नुकतेच शिवसेना ओएफसीचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीला गेले. तेथे पहिल्यांदा अमित शाह काही भेटले नाहीत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवर्जून भेटले. त्या भेटीत तब्बल दिड तास देशाचे पंतप्रधान मोदी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती शिवसेना ओएफसीने सर्व प्रसारमाध्यमांमध्ये दिली. पंतप्रधान मोदी यांच्याशी इतकी जवळीक असल्याचे दिसून आल्यानंतर मात्र सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणूकी केवळ एक मत भाजपाला कमी होते. तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे दोन मते जास्तीची होती.

तरीही भाजपाने त्यांची मते कमी असतानाही भाजपाच्या महिला उमेदवार प्रिया शिंदे या विजयी झाल्या. मात्र त्यांच्या विजयासाठी साध्या वेशातील पोलिसांनी साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर हल्ला केला, त्यांना धक्काबुक्की केली त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न झाला. असे सांगत त्यांच्या सोबत असलेल्या दोन मतदारांनाही शंभूराज देसाई यांच्यापासून पळवून नेल्याची घटना शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितली. तर विधानसभेत विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

तर विधान परिषदेत साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या दिवशी दोन मतदारांना घेऊन मतदान केंद्रावर गेले. तेथील दोन व्यक्तीनी आपल्या सोबत असलेल्या दोन मतदारांना पळवून नेले तर तसेच या दोघांना पळवून नेत्यासाठी आपल्याशी धक्काबुक्की केली. तर मारहाणीचा प्रयत्न केला, बोचकारले, माझं रक्त काढले आदी गोष्टी घडल्याची माहिती आपल्या भाषणातून विधान परिषदेत दिली.

यावरून सत्तेसाठी भाजपाने महायुतीतील सहकारी असलेला पक्ष शिवसेनाओएफसी पक्षाच्या मंत्र्यांना मारहाण करायलाही मागे-पुढे पाहिले नाही. यावरून शिवसेना ओएफसी आणि भाजपामध्ये सत्तेसाठी लाचार आणि टगेपणा दिसून आला.

दरम्यान, सातारा घटनेप्रकरणी विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनातून बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळावर संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत म्हटले की, “मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे.” या घटनेला त्यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे प्रकरण ठरविले. सदरची बाब त्यांनी आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली.

विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, निवडणुकीपूर्वीच शंभूराज देसाई आणि मकरंद  पाटील यांनी त्यांना फोन करून दोन मतदारांवर अचानक गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती. या प्रकारामागे निवडणुकीचा निकाल बदलण्याचा प्रयत्न असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर शिंदे यांनी तत्काळ साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्याशी संपर्क साधून स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, मतदान पूर्ण होईपर्यंत कोणत्याही मतदाराला अडवू नये. मात्र प्रत्यक्षात दोन मतदारांना ताब्यात घेण्यात आल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

या घटनेचा निषेध करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारे मतदारांना मतदानापासून रोखण्याची घटना प्रथमच घडली असून हा प्रकार लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर आघात करणारा आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे सहन केले जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सभागृहाला सांगितले.

Exit mobile version