Marathi e-Batmya

सचिन अहिर यांचे पुन्हा पक्षांतर न करताच विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिंदेच्या शिवसेनेत

काही दिवसांपूर्वी खासदार ओमराजे शिंदे यांच्या प्रसारमाध्यमाशी सांगितल्या प्रमाणे शिवसेना उबाठातील सहा खासदारांचे केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे राष्ट्रीय नेते अमित शाह यांच्याशी फोनवरून बोलणे केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय़ घेतला. त्यास काही दिवसांचा अवधी लोटत नाही तोच आता विधान परिषदेचे आमदार तथा राष्ट्रवादीचे माजी मंत्री सचिन अहिर यांनी आज विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने उमेदवारी अर्जही भरला. यापूर्वी उपसभापती पदावर नीलम गोऱ्हे या होत्या. मात्र त्यांच्या आमदाराकीचा कार्यकाल संपल्याने त्यांचा उपसभापती पदावरील कार्यकालही संपुष्टात आला. त्यामुळे त्या रिक्त झालेल्या जागेवर शिवसेना उबाठाचे सचिन अहिर यांना शिंदे गटाकडून संधी देण्याचा निर्णय घेत तशी राजकिय ऑफरही देण्यात आली. त्यावर सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरला.

दरम्यान या घटनेने एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या धक्कातंत्राची नकल केली असल्याची चर्चा विधानसभात सुरु झाली. तसेच या घटनेने अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी सोहळ्याची आठवण झाली असल्याची चर्चाही यावेळी सुरु झाली.

दरम्यान देशात भाजपाची आली होती. त्यावेळी शिवसेना उबाठा हा पक्ष भाजपाबरोबरच्या युतीतमध्ये होता. त्यावेळी सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मात्र सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा न देताच त्यावेळी एकसंध असलेल्या शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. आता सचिन अहिर हे शिवसेना उबाठा मधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना ओएफसीमध्ये प्रवेश करत उपसभापती पदासाठी विधान भवनाच्या प्रशासनाकडे अर्ज भरला.

दरम्यान सहा खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना उबाठाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिवसेनाओएफसीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का असल्याचे बोलले जात आहे.

सचिन अहिर यांनी पक्षांतर न करताच थेट शिवसेनाओएफसीकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज भरल्याने काहीसा आर्श्चयाचा धक्का बसला असून राष्ट्रवादीतून शिवसेना उबाठात प्रवेश करताना ज्या राजकिय चुक केली त्याच पद्धतीची राजकिय चुक सचिन अहिर यांनी पुन्हा एकदा केल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version