विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रायगड अलिबाग येथील कातकरी आदिवासींची जमिन जबरदस्तीने बळकावून घेतली. तसेच या कातकरी आदिवासींना कोणतीही रक्कम न देता त्यांची जमिन फसवणूक करत बळकावली असून सरकार दप्तरी नोंद कातकरी आदिवासीची जमिन अशी असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे एजंट दशरथ पाटील यांनी बुलडोझरच्या सहायाने आदिवासींच्या घरांची तोडफोड करत त्यांची घरे नष्ट करण्याची आणि तेथील बोअरवेल उखडून टाकत आदिवासींच्या रहाण्याच्या खुणा नष्ट केल्या. सदर प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्रपणे करावी अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी एक पत्र पाठवित केली.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले की, सदर कातकरी आदिवासी समाजाच्या नागरिकांच्या जमिनी ताकदीच्या बळावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जबरदस्तीने बळकावली आहे. तसेच कातकरी आदिवासी समाजाची जमिन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पत्नीच्या नावे खरेदी दाखविण्यात आली आहे. तसेच या जमिनीवर या कातकरी आदिवासींचा कोणताही अधिकार नाही अशा आशयाच्या कागदपत्रांवर कातकरी आदिवासींचे आंगठे ही घेण्यात आले. सदरचे कातकरी आदिवासी हे शिक्षित आहेत. त्यांना लिहिता-वाचता येत नसल्याने त्या कागदांवर त्यांचे आंगठे घेण्यात आल्याचा आरोपही केला.
@rahulnarwekar यांचे अलिबाग येथील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरण,
नार्वेकर माझ्या विरोधात कोर्टात जाणार आहेत;
छान 👌
त्यांनी जायलाच हवे..संवैधानिक पदावर असलेली व्यक्ती अधिकाराचा गैरवापर करून आदिवासींना कसा त्रास देत आहे ते नीट उघड होईल!
आणि @cbawankule जी उगाच नार्वेकरांची वकिली करू नका;निदान तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नाही!
उल्का महाजन काय सांगत आहेत ते ऐका! प्रकरण गंभीर आहे,
@Dev_Fadnavis— Sanjay Raut (@rautsanjay61) November 23, 2026
संजय राऊत पुढे आपल्या पत्रात म्हणाले की, त्याचबरोबर त्या कातकरी आदिवासींना जबरदस्तीने इतर ठिकाणी जबरदस्तीने स्थलांतर कऱण्यात आले. तेथे बांधलेल्या घरात त्यांचे स्थलांतर केले. मात्र सदरची जमिन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मालकीची नसून ती दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे आहे. त्या जमिनीवरूनही कातकरी आदिवासी नागरिकांना त्या ठिकाणाहून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला.
अलिबाग येथील आदिवासींच्या जमिनी बाबत @cbawankule यांनी थातुर मातुर बोलू नये;
विधानसभा अध्यक्ष @rahulnarwekar यांची बाजू घेण्या आधी या विस्थापित झालेल्या आदिवासींचे म्हणणे ऐका;
@Dev_Fadnavisअलिबागच्या म्हात्रोळी वाडीतल्या आदिवासींचा बेघर केल्याचा आरोप, काय आहे ह… https://t.co/3OSqyrm9Ru via @YouTube
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 23, 2026
शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपावर बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, संजय राऊत यांनी यापूर्वीही माझ्यावर अशाच प्रकारचे आरोप होते. आताही ते अशाच प्रकारचे आरोप करत आहेत. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात न्यायालयात नक्की जाणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी
सांविधानिक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने कसं वागू नये याचे हे ऊत्तम उदाहरण आहे;अलिबाग तालुक्यातील आदिवासींच्या जमीनींवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करण्यात येत असल्याचा आरोप सतत करण्यात आला आहे!आदिवासी त्यांच्या जमीन घरांसाठी आंदोलन करत असताना सरकार कोठे आहे?
कोणाच्या बाजूने आहे?
@Dev_Fadnavis
@PMOIndia
@AmitShah
@cbawankule— Sanjay Raut (@rautsanjay61) November 23, 2026
तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्वतः वकील आहेत. त्यामुळे ते अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करतील असे दिसून येत नाही. परंतु संजय राऊत यांच्याकडे तशा आशयाचे पुरावे असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे द्यावेत. जेणेकरून मुख्यमंत्री स्वतंत्रपणे त्याची चौकशी करतील असे सांगत राहुल नार्वेकर यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला.
