नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अपराजित म्हणून असलेल्या भाजपाला बहुमताच्या जवळपास फिरकू न देण्याचे आव्हान देशभरातील विरोधकांनी केले. इंडिया आघाडीने भाजपा आणि भाजपा प्रणित आघाडीला २९० जागांवर रोखले. तर काँग्रेसला ९९ जागांवर तर इंडिया आघाडीला २३५ जागांवर रोखले. तर त्यातच महाराष्ट्रात ४८ जागांपैकी भाजपा प्रणित महायुती सरकारला तर १७ जागांवर रोखत काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीला ३१ जागा मिळविण्यात यशस्वी ठरली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा मिळवून देण्यात शरद पवार यांची महत्वाची भूमिका असल्याचे बोलले जाते. तसेच आगामी तीन-चार महिन्यानंतर राज्यात विधानसभेच्या निवडणूका जाहीर होणार असून या विधानसभा निवडणूकीच्या तयारीला सध्या महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी आतापासून तयारी केली आहे.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे शिवसेना उबाठा गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी आतापासूनच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह समर्थकांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. एकाबाजूला शिवसेना उबाठा गटाचे उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या शिवसैनिकांना निवडणूकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही गाव पातळीवर पुन्हा एकदा स्वतःच संप्रक साधण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने शरद पवार यांनी आज इंदापूर येथील दौऱ्यात काही स्थानिक शेतकरी आणि ग्रामीण जनतेशी संवाद साधला. त्यावेळी शरद पवार यांनी या सर्वांना फक्त चार-सहा महिने थांबा मला हे सरकार बदलायचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांना रस्त्यावर उतरावे लागेल असे सांगत शेतकऱ्यांसह ग्रामीण जनतेला आश्वस्त करत सत्ताधारी महायुतीतील पक्षांना इशारा दिला.
तर पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतानाही चार सहा महिने थांबा हे सरकार मला बदलायचं आहे. हे सरकरा बदलल्याशिवाय शेतकऱ्यांसाठी हवी तरी धोरणं राबविता येत नाहीत सरकार बदलल्यानंतर शेतकऱ्यासाठी काम करू असे सांगितले.
त्याचबरोबर शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, मागील दोन-तीन दिवसात वातावरण बललेलं आहे. पण समाधानकारक नाही, पीक येतील अशी परिस्थिती नाही, चाऱ्याचा प्रश्न सुटल्याचे दिसत नाही. तुमच्याकडून माहिती घेणे आणि राज्य सरकारशी बोलून याप्रश्नांची ,सोडवणूक करणे यासाठी हा प्रयत्न असल्याचेही सांगितले.
