राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी सुनेत्रा पवार यांनी निवड करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता राजभवनावर झालेल्या छोटेखानी शपथविधी संमारंभात उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शपथ दिली.
मागील काही वर्षापासून पुरोगामी महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री पदी कधी विराजमान होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या ठिकाणी त्यांच्याच पत्नी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे अशा दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नाही पण पहिली महिला उपमुख्यमंत्री झाल्याचे चित्र पाह्यला मिळालं.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील.@SunetraA_Pawar
— Narendra Modi (@narendramodi) January 31, 2026
यावेळी राजभवनात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजित पवार अमर रहे. एकच वादा अजित दादा यासारख्या घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राजभवनातच दिल्या. या शपथविधी सोहळ्याला सुनेत्रा पवार यांचे भाऊ तथा शरद पवार यांचे एकेकाळचे मंत्रीमंडळातील सहकारी डॉ पद्मसिंह पाटील, भाचे तथा आमदार राणा जगजीत सिंह आदी उपस्थित होते.
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे.
खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू..!
डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना… pic.twitter.com/Hon07ArlFL— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 31, 2026
