Marathi e-Batmya

गद्दार ज्ञानु मस्ट गो, घोषणा देत मुंबईत आझाद मैदानावर सीजेपीच्या हजारो युवा विद्यार्थ्यांचे आंदोलन

निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या एसआयआरच्या नावाखाली करण्यात आलेल्या मतचोरीच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टी- सीजेपीने जाहिर केल्याप्रमाणे आझाद मैदानाच्या गेट नंबर सहाच्या बाजूला आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशाच्या अनेक भागातून युवा पिढी हजारोंच्या संख्येने येऊन सहभागी झाली. तसेच आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी युवा पिढीने त्यांच्या हाती असलेले पोर्टस मधून त्यांची जेन एक्सची वेगळी भाषाशैली दाखवून दिल्याचे पाहिले.

यावेळी आंदोलनाच्या सुरुवातीला ज्ञानेश यु डीड इट ब्रो या घोषणेने सुरुवात केली. तर आज आंदोलनाच्या दिवशी ज्ञानु यु मस्ट गो अशी घोषणा देत आंदोलनास सुरुवात केली. सीजेपीकडून उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या स्टेजवरही ज्ञानु मस्ट गो हीच घोषणा लिहिण्यात आली. या आंदोलनाच्या मुख्य स्टेजवर महात्मा गांधी यांचे खापर पणतु तुषार गांधी अभिनेते नसिरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासह संगीतकार विशाल ददलानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आंदोलनात सहभागी झाले. तसेच या सेलिब्रिटीकडून मतचोरीच्या विरोधात भूमिका मांडत सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा जाहिर केला.

सीजेपीच्या आंदोलनाला दुपारी चार पासून सुरुवात झाली. मात्र काल सकाळपासूनच देशाच्या विविध भागातून युवा पिढी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कवर जमा होत होती. आज आंदोलनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर युवा पिढी या आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून येत होते. त्याचबरोबर या आंदोलनात शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे हे ही सहभागी झाल्याचे पाह्यला मिळाले.

आंदोलनात युवा विद्यार्थ्यांकडून ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात पोस्टर्स झळकाविण्यात येत होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही मोठ्या प्रमाणावर उपाहासात्मक टीपण्णी करणारे घोषवाक्य लिहिलेली पोस्टर्स युवकांकडून प्रदर्शित करण्यात येत होती. यावेळी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला काँऊटर करण्यासाठी सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून कॉकरोच जनता पार्टीच्या विरोधात मंत्रालयापासून जवळ असलेल्या डॉ बाबासाहेबे आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येत होते. मात्र त्या आंदोलनास मुंबईकरांनी फारसा प्रतिसाद दिल्याचे पाह्यला मिळाले नाही. मात्र काही काळ मुंबईकरांच्या मनामध्ये काही काळ या आंदोलनामुळे संभ्रम निर्माण झाला. मात्र मुंबईकरांनी सत्ताधाऱ्यांचा हा कावा लक्षात घेत शिवाजी पार्क येथील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी धाव घेत तेथील आंदोलनात सहभागी झाले.

दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनात मोठ्या प्रमाणावर तरूण विद्यार्थ्यांचे आंदोलन

देशातील ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाची सुरुवात कॉकरोच जनता पार्टीने मुंबईच्या आझाद मैदानातून करण्यात आली. मुंबईसह दिल्ली, रांची, पटना, पश्चिम बंगालच्या कोलकाता आदी राजधानी भागात कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले.

दिल्लीतही आयसा (AISA), सीपीय, सीपीआयएम आदी संघटनांच्या वतीने आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांच्यासह अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. दिल्ली पोलिसांनीही जंतर मंतर परिसरात मोठ्या प्रमाणाव बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यासाठी पॅरामिलिटरी फोर्सेस आणि बिगर नेमप्लेटचे पोलिस मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले होते.

तसेच या पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थी आणि युवकांना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनापासून रोखण्याचा आणि त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत होते. परंतु पोलिसांच्या दबावाला न घाबरता या युवकांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या आंदोलकांना अटक करून पोलिस स्टेशनला नेऊन स्थानबद्ध केले. या स्थानपद्धती विरोधात अनेक राजकीय पक्षांनी दिल्ली पोलिसांवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.

दिल्ली आणि मुंबईत आंदोलन होत असले तरी युवकांबरोबर तरूणांच्या पालांनीही या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. तसेच पोलिस यंत्रणेच्या संख्याबळाच्या दबावाला भीकही घातली नसल्याचे पाह्यला मिळाले.

Exit mobile version