राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ३८ उमेदवारांची पहिली यादी २३ ऑक्टोबरला जाहीर केल्यानंतर आज ७ उमेदवारांची दुसरी यादी प्रदेश कार्यालयात जाहीर केली. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी आज जाहिर झाली. या यादीत नवाब मलिक यांच्या उमेदवारी ऐवजी त्यांची कन्या सना मलिक-शेख यांना अनुशक्ती नगरमधून उमेदवारी जाहिर करण्यात आली. याशिवाय भाजपाच्या दोन माजी खासदारांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.
त्याचबरोबर अद्याप काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश न केलेले स्व.बाबा सिद्धीकी यांचे चिरंजीव आमदार झिशान सिध्दीकी यांचा आज अधिकृतरित्या अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. यावेळी झिशान सिद्धीकी यांना वांद्रे पूर्व मधून उमेदवारी जाहिर करण्यात आली.
तर भाजपाचे तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांचा लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्याने त्यांना विधानसभेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. याशिवाय भाजपाचे नांदेड येथील माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत पराभव झाला. त्यामुळे त्यांनाही राष्ट्रवादीतून उमेदवारी जाहिर करण्यात आली. आतापर्यंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४५ जणांची उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केलेले उमेदवार खालीलप्रमाणे :
अणुशक्तीनगर – सना मलिक – शेख
इस्लामपूर – निशिकांत पाटील
तासगाव – कवठेमहांकाळ – संजयकाका पाटील
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी
वडगाव शेरी – सुनिल टिंगरे
शिरूर – ज्ञानेश्वर कटके
लोहा – प्रताप पाटील – चिखलीकर आदींचा समावेश आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, आमदार इद्रीस नायकवडी, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, मुंबई महिला जिल्हाध्यक्षा पुजा पवार आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्व उमेदवारांना विजयी… pic.twitter.com/0se0ZswfgR
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) October 25, 2024
