पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते.आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सेनेन चोख उत्तर दिले. भारतीय सशस्त्र दलाच्या कारवाईने दहशतवाद्यांना दिले उत्तर, त्यांच्या धैर्याला सलाम अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, ‘ ऑपरेशन सिंदूरच्या ‘ माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यावर क्षेपणास्त्र हल्ला भारतीय हवाई सेनेन केली. यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. निष्पाप भारतीयांना न्याय देण्यासाठी सैन्याने केलेल्या या कारवाईचे आम्ही अभिनंदन करतो असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधून भारतावर होणाऱ्या दहशतवादी कारवाया विरोधात भारताने नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. भारताविरुद्ध कोणताही दहशतवाद भारत सहन करणार नाही हाच संदेश आज या कारवाई मधून देण्यात आला आहे. भारतीय सैन्याने दाखवलेल्या धैर्याचा आणि दृढनिश्चयाचा आम्हाला अभिमान आहे असेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, याआधी देखील देशावर जेव्हा संकट आले तेव्हा भारतीय सैन्याने कारवाई केली आहे. आणि आज देखील दहशतवाद्या विरोधात केलेल्या कारवाईने दाखवून दिले की, भारत आपल्या नागरिकांवर होणारे हल्ले सहन करणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती आणि आज भारतीय सैन्याने एक मोठा धडा पाकिस्तानला शिकवला आहे. दहशतवाद विरोधात भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कारवाईला आमचा पाठिंबाच असल्याचे यावेळी सांगितले.
