Marathi e-Batmya

बिहार काँग्रेसने जारी केला पंतप्रधान मोदीना त्यांची आई रागवतानाचा व्हिडिओ

काही दिवसांपूर्वी बिहार विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदी यांच्या आईवरून काँग्रेसच्या सभेत अपशब्द वापरण्यावरून भाजपाने काँग्रेसवर टीका केली. तसेच पहलगाम येथील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि भाजपाकडून सिंदूर चा मुद्दा उचलून धरत भाजपाने जनतेला भावनिक करण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्वभूमीवर बिहार काँग्रेसने एक एआय व्हिडिओ जारी करत पंतप्रधान मोदी यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. या व्हिडिओवरून भाजपाने टीका केली असून या व्हिडिओवरून काँग्रेसने खालचा स्तर गाठला असल्याची टीका केली.

बिहार काँग्रेसने जारी केलेल्या एआय व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी हे स्वतःशी बोलत व्होट चोरीचे आजचे काम झाले असून आता मी जरा झोपतो असे म्हणून ते त्यांच्या बेडवर जाऊन झोपतात. त्यानंतर पतप्रधान मोदी यांच्या स्वप्नात त्यांच्या मातोश्री हिराबेन मोदी या येतात आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर ओरडताना दिसून येतात, हिराबेन मोदी या मोदी यांना बोलतात, नोटबंदीच्या काळात मला बँकेच्या लांबलचक लाईनीत उभे केले, त्यानंतर माझे पाय धुतानाचे रील बनवले आणि आता बिहार विधानसभा निवडणूकीत नौटकी करत आहेत, माझ्या नावावर राजकारण करत आहेत. राजकारणासाठी इतख्या खालच्या पातळीवर उतरशील असे वाटले नव्हते असे सुनावले. या स्वप्नामुळे पंतप्रधान मोदी हे अचानक झोपेतून जागे होतात. बिहार काँग्रेसने जारी केलेल्या या व्हिडिओवर मात्र भाजपाने टीकेचा सुरु लावला आहे.

भाजपाच्या टीकेवर काँग्रेस प्रवक्ते पवन खेऱा म्हणाले की, आपल्या मुलांना चांगली शिकवण देणे हे पालकांचे कर्तव्य असते. त्या हिराबेन मोदी या फक्त आपल्या मुलाला शिक्षण देत आहेत. जर मुलाला (पंतप्रधान मोदी) असे वाटत असेल की हे अनादर करणारे आहे. तर ही त्यांची समस्या आहे.

तर भाजपाने काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, यातून महिलांचा अवमान करण्यात आला असून काँग्रेसने आपली पातळी दाखवून दिली.

Exit mobile version