Marathi e-Batmya

पंतप्रधान निवासस्थानासमोरून राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनस्थळ हटवण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनस्थळावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फरफटत नेऊन घेऊन जात आहेत.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांकडून फरफटत नेत असल्याचा एक व्हिडिओ ‘याद रखा जाएगा’ या मथळ्यासह पोस्ट केला आहे.

दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेत असताना काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या, “ते भित्रे आहेत. ते घाबरलेले आहेत. आम्ही त्यांना घाबरत नाही. ते आम्हाला घाबरतात.”

“भारतात लोकशाही आता घडत आहे,” असे राहुल गांधी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर म्हणाले.

दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे सर्व खासदार आणि काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेत त्या सर्वांवर स्थान बद्धतेची कारवाई केली. तसेच या सर्वांना पोलिस व्हॅनमधून पोलिस स्थानकाकडे घेऊन गेले.

राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. तर अखिलेश यादव हे समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि संसदेतील गटनेते आहेत. त्यामुळे या सर्व नेत्यांना ताब्यात घेताना पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काही काळ तणाव निर्माण झाला.

परंतु, दरम्यान या सर्वांवर स्थआन पद्धतेची कारवाई पोलिसांकडून करण्यात आली.

 

Exit mobile version