Marathi e-Batmya

राहुल गांधी यांचा हल्लाबोल,भारतातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीवरील हल्ला

काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते (LoP) राहुल गांधी यांनी गुरुवारी (२ ऑक्टोबर २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आणि भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असल्याचे प्रतिपादन केले.

कोलंबियाच्या ईआयए EIA विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना, राहुल गांधी यांनी “रचनात्मक त्रुटी” या मुद्द्यावर प्रकाश टाकला आणि देशाच्या विविध परंपरांना भरभराटीला येऊ दिले पाहिजे असे सुचवले. भारताकडे अभियांत्रिकी आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रात मजबूत क्षमता आहेत, म्हणून मी देशाबद्दल खूप आशावादी आहे. परंतु त्याच वेळी, संरचनेत काही त्रुटी देखील आहेत ज्या भारताला दुरुस्त कराव्या लागतील. सर्वात मोठे आव्हान म्हणजे भारतात होत असलेला लोकशाहीवरील हल्ला, असेही यावेळी सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी पुढे म्हणाले की, विविधतेसाठी लोकशाही व्यवस्था महत्त्वाची आहे, ज्यामुळे धार्मिक श्रद्धांसह विविध परंपरा, चालीरीती आणि विचारांना भरभराटीला येऊ दिले जाते. तथापि, भारतातील लोकशाही व्यवस्था आक्रमणाखाली आहे, जी एक “मोठी जोखीम” किंवा धोका असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, भारतात अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत – खरं तर, हा देश मुळात या सर्व लोक आणि संस्कृतींमधील संवाद आहे. वेगवेगळ्या परंपरा, धर्म आणि विचारांना जागा आवश्यक असते आणि ती जागा निर्माण करण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे लोकशाही व्यवस्था, असेही याववेळी सांगितले.

पुढे बोलताना राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, सध्या, या लोकशाही व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात हल्ला होत आहे आणि तो एक मोठा धोका आहे. आणखी एक मोठा धोका म्हणजे देशाच्या काही भागात वेगवेगळ्या संकल्पनांमधील तणाव. १६-१७ प्रमुख भाषा आणि अनेक धर्म असल्याने, या विविध परंपरांना वाढू देणे आणि त्यांना आवश्यक असलेली जागा देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष (भाजपा) जोडीवर राहुल गांधी टीका करत म्हणाले की “भ्याडपणा” त्यांच्या विचारसरणीच्या केंद्रस्थानी आहे. “हे भाजपा-आरएसएसचे स्वरूप आहे. जर तुम्हाला परराष्ट्रमंत्र्यांचे विधान लक्षात आले तर ते म्हणाले, ‘चीन आपल्यापेक्षा खूप शक्तिशाली आहे. मी त्यांच्याशी लढण्याचा पर्याय कसा निवडू शकतो?’ विचारसरणीच्या केंद्रस्थानी भ्याडपणा आहे,” असल्याची टीकाही यावेळी केली.

Exit mobile version