विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा वापर करण्यास अधिकृत केल्याचा आरोप करणाऱ्या आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पदावरून हटवावे या मागणीचा पुनरुच्चार केला.
काही तासांपूर्वी, राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे लोकसभेतील कागद पत्र फुटी विरोधी विधेयकावरील चर्चेदरम्यान राजकीय वादळ निर्माण झाले होते. एनडीएच्या खासदारांनी माफीची मागणी केली होती आणि त्यांना आपले आरोप सिद्ध करण्यास सांगितले होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही हस्तक्षेप करत विरोधी पक्षनेत्यांना आठवण करून दिली की सभागृहात केलेले आरोप पुराव्यांसहित असले पाहिजेत.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, अमित शाह यांना पदावरून दूर करा, हा माझा पंतप्रधान मोदींना सल्ला आहे, असे नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दावा केला की, माफी मागितल्यास भाषण सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते, परंतु ते भाजप किंवा आरएसएसची “कधीही माफी मागणार नाहीत” असे निर्धार सांगितले.
राहुल गांधी म्हणाले की, राजनाथ सिंह आणि किरेन रिजिजू यांना अनेक वेळा बोलण्याची परवानगी देण्यात आली. मला आश्वासन देण्यात आले होते की, माफी मागितल्यास भाषण सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाईल. मी भाजप किंवा आरएसएसची कधीही माफी मागणार नाही, असेही सांगितले.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, विरोधी पक्षनेते म्हणून राष्ट्रीय महत्त्वाचे मुद्दे मांडणे हा आपला हक्क आहे, आणि कथित नीट पेपरफुटीचा निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई हा देशासमोरील सर्वात गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.
LIVE: Press Conference | Indira Bhawan, New Delhi https://t.co/reKAidPIoX
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 29, 2026
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, माझ्या मते, आजचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, आपले विद्यार्थी, जे मोकळ्या मनाचे आहेत आणि प्रश्न विचारतात, त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले,असा आरोपही यावेळी केला.
आपल्या आरोपांचा पुनरुच्चार करत राहुल गांधी यांनी दावा केला की, विद्यार्थ्यांवर पेलेट गनने गोळीबार करण्यात आला आणि एका विद्यार्थ्याची एका डोळ्याची दृष्टी जाण्याची शक्यता असल्याचे सांगत पेलेट गनने गोळी लागलेल्या एका मुलाचा डोळा जाण्याची दाट शक्यता आहे. मी एम्सचे वैद्यकीय प्रमाणपत्र पाहिले आहे, ज्यात त्याला पेलेट गनने गोळी लागल्याचे दिसून येते, असेही यावेळी सांगितले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी असाही आरोप केला की, आंदोलकांवरील कारवाईदरम्यान, महिला आणि अल्पवयीन मुलांसहित, पोलिसांनी “शॉक बॅटन” आणि “नखे लावलेल्या लाठ्या” वापरल्या. पोलिसांना ही कल्पना कुठून सुचली? महिला आणि अल्पवयीन मुलांना खिळे लावलेल्या लाठ्यांनी मारहाण करणे, असा सवाल करत एका पोलीस अधिकाऱ्याने आंदोलकाला कानशिलात मारल्याचे आपण पाहिल्याचेही सांगितले.
राहुल गांधी यांनी पुढे असाही आरोप केला की, आंदोलनादरम्यान अमित शाह पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश देत असल्याचे त्यांनी स्वतः पाहिले होते.
राहुल गांधी बोलताना म्हणाले की, जेव्हा आम्ही संसद भवनात होतो, तेव्हा अमित शाह पोलीस अधिकाऱ्यांना बोलावताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. जितेंद्र सिंह यांना अमित शाह यांचे एकामागून एक फोन येत असल्याचे मी पाहिले. काय चालले आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती, हे अगदी स्पष्ट होते, असा आरोपही यावेळी केला.
या आरोपांमुळे यापूर्वी सत्ताधारी बाकांवरून विरोध झाला होता आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गांधी यांनी आपल्या दाव्यांचे पुरावे सादर करावेत अशी मागणी केली होती.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे आरोप ‘वस्तुतः चुकीचे’ असल्याचे सांगत फेटाळून लावले आणि आंदोलनादरम्यान एकही गोळी झाडली गेली नाही किंवा गोळीबार करण्याचा कोणताही आदेश देण्यात आला नव्हता, असे ठामपणे सांगितले.
बुधवारी लोकसभेत आवाजी मतदानाने सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६ मंजूर होण्यापूर्वी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून हा गदारोळ झाला.
या कायद्यामुळे पेपरफुटी विरोधी कायद्यात मोठे बदल करण्यात आले आहेत, ज्यात दोषींसाठी १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाच्या कठोर शिक्षेचा समावेश आहे.
