Marathi e-Batmya

राहुल गांधी यांनी विद्यार्थी आणि इतर मधील फरक स्पष्ट केल्याने सत्ताधाऱ्यांचा गोंधळ

बुधवारी लोकसभेत गदारोळ पाहायला मिळाला. तरुणांच्या अलीकडील निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सरकारवर टीका करताना, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका विद्यार्थ्याशी झालेल्या संभाषणाचा संदर्भ देत ‘असंसदीय’ शब्द वापरला. ‘पेपर लीक’ विरोधी कायद्यातील सुधारणांवरील चर्चेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी ‘विद्यार्थी’ आणि ‘इतर’ यांच्यातील फरक स्पष्ट केला. परंतु सत्ताधारी बाकावरून पंतप्रधान नरॆंद्र मोदी यांच्या सत्ताधारी  समर्थकांकडून घातला गेला त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाले त्यावेळी

राहुल गांधी म्हणाले की, त्या १८ वर्षांच्या तरुणीने ‘विद्यार्थी’ म्हणजे असे लोक जे ज्ञान मिळवू इच्छितात आणि इतरांचे म्हणणे ऐकण्यास तयार असतात, असे वर्णन केले; तर ‘इतर’ श्रेणीत असे लोक येतात जे भिन्न मते ऐकण्यास नकार देतात आणि आपल्यालाच सर्व काही माहित आहे असे मानतात असे सांगितले.

राहुल गांधी यांनी पुढे बोलताना सांगितले की, त्या तरुणीने विद्यार्थ्याचे वर्णन “मोकळे मन आणि मोकळे हृदय असलेली व्यक्ती” असे केले होते.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, लोकांचा आणखी एक गट आहे… जे विद्यार्थी नाहीत; त्यांना सर्व काही माहित आहे… त्यांना वाटते की तेच देव आहेत. ते अहंकारी आहेत, ते कोणाचेही ऐकत नाहीत आणि इतरांच्या सत्याचा आदर करत नाहीत,अशी उपरोधिक टीका पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे नाव न घेता केली.

यामुळे लोकसभेत मोठा गदारोळ निर्माण झाला; एनडीएच्या खासदारांनी त्या ‘असंसदीय’ शब्दावर आक्षेप घेतला आणि तो शब्द कामकाजातून वगळण्याची मागणी केली.

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू त्वरित उभे राहत म्हणाले की, मला वाटते की ते (राहुल गांधी) विद्यार्थ्याच्या नावाने शब्द वापरत आहेत, पण प्रत्यक्षात ते स्वतःच तो शब्द वापरत आहेत, असे म्हणाले.

लवकरच, एनडीएचे इतर खासदारही राहुल गांधी यांच्या विरोधात किरेन रिजिजू यांच्यासोबत निषेध करू लागले. या गोंधळाच्या वातावरणात, राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की हे विधान सभागृहातील कोणत्याही सदस्याला किंवा सत्ताधारी पक्षाला उद्देशून केलेले नव्हते.

तरीही, एनडीएचे खासदार शांत झाले नाहीत. ‘इतर’ श्रेणीचा उल्लेख करण्यासाठी राहुल यांनी वापरलेला शब्द नंतर सभापतींनी कामकाजातून वगळला.

थोड्या विश्रांतीनंतर, राहुल गांधी यांनी पुन्हा आपले भाषण सुरू केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर निशाणा साधत, त्यांनी शिक्षण व्यवस्था “उध्वस्त” केल्याचा आरोप केला.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, शिक्षण व्यवस्थेचा आत्मा आरएसएसने आपल्या ताब्यात घेतला असल्याचे सांगत पुढे म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांनी कधीही शिक्षण मंत्रालय चालवले नाही. धर्मेद्र प्रधान हे केवळ एक प्रतीक आहेत. आरएसएस हाच आपल्या विद्यार्थ्यांचा खरा शत्रू असल्याचा आरोपही यावेळी केला.

विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील मोठ्या निदर्शनांनंतर गेल्या आठवड्यात धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला. या निदर्शनांचे नेतृत्व ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) ने केले होते. २० जुलै रोजी संसदेकडे निघालेल्या विद्यार्थी आंदोलकांवर करण्यात आलेल्या कारवाईवरून विरोधी पक्षनेत्याने गृहमंत्री अमित शाह यांना विशेषतः लक्ष्य केले. राहुल गांधी यांनी कोणताही आडपडदा न ठेवता, विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांचे “आदेश” शाह यांनीच दिले होते, असा थेट आरोप केला.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांवरील हल्ल्याबाबत संसदेत येऊन बोलण्याचे धाडस आता अमित शाह दाखवत नाहीत, असे म्हणाले.

२० जुलै रोजी झालेल्या हिंसाचारादरम्यान, विद्यार्थी आंदोलक संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले असता त्यांच्यावर अश्रूधुराचा वापर करण्यात आला आणि लाठीचार्ज करण्यात आला. आरएएफ (RAF) जवानांनी पेलेट गनचा वापर केल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. या घटनेत सुमारे १२० पोलीस कर्मचारीही जखमी झाले.

किरेन रिजूजी यांनी पुन्हा एकदा मध्येच हस्तक्षेप करत, पुराव्याशिवाय गृहमंत्र्यांवर “आरोप” न करण्याची ठाम सूचना राहुल गांधी यांना केली.

पुढे बोलताना किरेन रिजूजी विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचे आदेश अमित शाह यांनी दिले होते, याचा पुरावा कुठे आहे? असा सवाल करत किरेन रिजूजी यांनी विरोधी पक्षनेत्याला आपले शब्द मागे घेण्यास आणि माफी मागण्यास सांगितले.

यावर राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितले की, विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केवळ “गृहमंत्र्यांच्या आदेशानेच” केला जाऊ शकत होता.

यामुळे एनडीएच्या खासदारांकडून पुन्हा एकदा गदारोळ झाला. अखेरीस अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

Exit mobile version