Marathi e-Batmya

गुन्हा रद्द करा; अभिनेता समिक्षक कमाल खानची उच्च न्यायालयात धाव

आपल्याविरूद्ध अनुक्रमे २०१८ आणि २०२४ मध्ये दाखल केलेले गुन्हे रद्द करावे, अशी मागणी करणारी याचिका चित्रपट अभिनेता आणि समीक्षक कमाल खानने उच्च न्यायालयात केली. आपण निर्दोष असून खोट्य़ा प्रकऱणात आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा कमाल खानने याचिकेतून केला आहे.

उच्च न्यायालयात दाखल याचिकेत समाजमाध्यमांवर अभिनेता धनुष आणि त्याच्या सहकलाकारांविरुद्ध अपमानास्पद टिपण्णी केल्याबद्दल कमाल खानविरोधात २०१७ मध्ये तक्रार करण्यात आली होती. कोणतीही महिला दाक्षिणात्य अभिनेता धनुषला स्पर्श करण्याची परवानगी कशी देऊ शकते, अशाप्रकारचे ट्विट कमाल खानने केले होते. परिणामी, एका महिलेच्या विनम्रतेचा अपमान केल्याबद्दल आणि सहकाऱ्यासोबत अभिनेत्याची अश्लील प्रतिमा शेअर केल्याबद्दल खानविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तथापि, खानने याचिकेव्दारे केलेले सर्व दावे फेटाळून लावले आहेत. आपण केलेले ट्विट आता अस्तित्वात नसून त्याच्याविरोधात अन्य कोणताही पुरावा नसल्याचेही कमाल खानने याचिकेत म्हटले आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, खानच्याविरुद्ध त्यांची परवानाधारक बंदूक जमा न केल्याबद्दल तक्रार करण्यात आली होती. मुंबई पोलीस शस्त्र जप्त करण्यासाठी कमाल खानच्या घरी गेले असता घर कुलूपबंद आढळले. याप्रकऱणी कमाल खानविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून लूक-आउट सर्क्युलर (एलओसी) बजावण्यात आली होती. त्यानंतर याप्रकऱणी उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर खानकडून बंदूक जमा करण्यात आली होती आणि एलओसी रद्द केले होते. २००८ मध्ये स्वसंरक्षणासाठी बंदूक घेतली होती आणि २०२४ पर्यंत त्यांना कधीही ती जमा करण्यास सांगितले गेले नव्हते. पोलिसांनी शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले तेव्हा आपण लंडनमध्ये होतो आणि त्यामुळे आदेशाचे पालन करू शकलो नाही, असा दावा कमाल खानने केला.

गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याची कमाल खानची ही पहिली वेळ नाही, याआधीही त्याचला एका प्रकऱणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी गुन्हा रद्द करण्यासाठी खानने उच्च न्यायालायात याचिका केली असून ती अद्यपही न्यायप्रविष्ट आहे.

Exit mobile version