Marathi e-Batmya

अरविंद केजरीवाल यांचा आरोप, पंतप्रधान मोदी यांनी आमच्याविरोधात कट रचला

आम आदमी पक्षाचे (आप) सुप्रीमो आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्ट असल्याचे सिद्ध करण्याचा कट रचला असल्याचा आरोप केला.

रविवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘जनता की अदालत’ कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्याविरुद्ध कट रचला. त्यांनी मला आणि (आप) नेते मनीष सिसोदिया यांना भ्रष्ट सिद्ध करण्याचा कट रचला. आमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला.

पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की ते गेली १० वर्षे “प्रामाणिकपणे” दिल्लीचे सरकार चालवत आहेत आणि पंतप्रधान मोदींना असे वाटले की “भाजपाला वाटले की, आप विरुद्ध जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांच्या प्रामाणिकपणावर हल्ला करणे” असा आरोपही यावेळी केला.

अरविंद केजरीवाल यांना १३ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने कथित दारू घोटाळा धोरण प्रकरणात जामीन मंजूर केला होता. मनीष सिसोदिया यांना २०२३ मध्ये दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि या वर्षी ऑगस्टमध्ये १७ महिन्यांनंतर दिल्ली दारू धोरण प्रकरणात जामिनावर तुरुंगातून सुटका करण्यात आली.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा भुकेला नसल्याने मी राजीनामा दिला. मी पैसे कमवण्यासाठी नाही, तर देशाचे राजकारण बदलण्यासाठी आलो आहे.

आपण काही दिवसांत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सोडणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, १० वर्षे मुख्यमंत्री राहूनही दिल्लीत घर नाही, जेव्हा भाजपाने त्यांना भ्रष्ट म्हटले तेव्हा त्यांना “दु:ख” वाटले आणि “दु:ख” झाले.

अरविंद केजरीवाल पुढे बोलताना म्हणाले की, अरविंद केजरीवाल बेईमान असते, तर त्यांनी वीज मोफत केली असती का? जर ते अप्रामाणिक असते, तर त्यांनी महिलांसाठी बसचे भाडे मोफत केले असते का? जर ते अप्रामाणिक असते, तर त्यांनी मुलांसाठी शाळा बांधल्या असत्या का? जर ते अप्रामाणिक असते, तर त्यांनी वीज फुकट केली असती का? २२ राज्यांत भाजपा सत्तेत आहे का, त्यांनी महिलांसाठी वीज किंवा बसची सुविधा मोफत केली आहे का? असा सवालही यावेळी केला.

केजरीवाल यांना तुरुंगात पाठवणारे तेच चोर होते का, असा सवालही त्यांनी केला.

Exit mobile version